acb arrests two along with sindkhed raja tahsildar sachin jaiswal in bribe case saam tv
क्राईम

Buldhana Crime News : निवडणुकीच्या धामधूमीत तहसीलदाराने घेतली 35 हजार रुपयांची लाच, सिंदखेड राजा पाेलिसांत गुन्हा दाखल

sindkhed raja latest marathi news : बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या रेतीच्या अवैध उपशाला आणि वाहतुकीला आळा बसावा यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.

संजय जाधव

Buldhana :

बुलढाणा जिल्ह्यात निवडणुकीच्या तोंडावर सिंदखेड राजा येथील तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. अवैध वाळू वाहतूक करताना पकडलेल ट्रॅक्टर सोडण्यासाठी जैस्वाल याने 35 हजार रुपयांची लाच घेतल्याने त्याच्यावर कारवाई झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या रेतीच्या अवैध उपशाला आणि वाहतुकीला आळा बसावा यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विविध तालुक्यात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई सुरु आहे. (Maharashtra News)

सिंदखेड राजा येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने पकडले हाेते. हे रेतीचे ट्रॅक्टर साेडविण्यासाठी तहसिलदा सचिन जैस्वाल याने लाचेची मागणी केली. तक्रारदाराने त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान हे ट्रॅक्टर सोडण्यासाठी जैस्वाल याने 35 हजार रुपयांची लाच घेतल्याने त्याच्यावर आज कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सिंदखेड राजा पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT