Crime News saam tv
क्राईम

Crime News: ८५४ कोटी, ८४ बँक खाती; MBA आणि इंजिनीअर तरूणानं एका बेडरूमच्या खोलीतून कसं विणलं सायबर जाळं?

Crime News: बंगळुरूच्या सायबर क्राईम पोलिसांनी ८५४ कोटी रुपयांच्या घोटळा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय.

Bharat Jadhav

बंगळुरूमध्ये एका घोटाळा घडकीस आला आहे. हा घोटाळा सायबर घोटाळा जेव्हा समोर आला तेव्हा अनेकांची डोके चक्रावले आहेत. फक्त एका बेडरुममध्ये सुरू झालेल्या बनावट कंपनीने ८४ बँक खात्याच्या मदतीने तब्बल ८५४ कोटी रुपये लाटले आहेत. कर्नाटक पोलिसांनी याप्रकरणी येलहांनका येथून ३३ वर्षीय एमबीए पदवीधर आणि ३६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केलीय. या काय आहे हा घोटळा ..(Latest News)

मागील महिन्यात बंगळुरूच्या सायबर क्राईम पोलिसांनी एमबीए पदवीधर मनोज श्रीनिवास आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर फणींद्र केसह अजून चारजणांना अटक केली होती. एका महिलेची ८.५ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यानंतर या महिलेने पोलिसात तक्रार केली होती. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या महिलेला एक मोबाईलवरुन छोटी गुंतवणूक करण्याचं आमिष दिलं होतं. या महिलेला या छोट्या गुंतवणुकीनंतर मोठा मोबदला मिळाला. त्यानंतर तिची फसवणूक झाली. या फसवणुकीचा तपास करताना पोलिसांना सायबर क्राइम हब झालेल्या भाड्याने घेतलेल्या वनरूम बेडरुमचा तपास लागाला.

या वनरुम बेडरुममध्ये एमबीए आणि इंजिनिअरने एक ऑफिस थाटलं होतं. यात बनावट ऑफिसमधून देशभरातील हजारो लोकांना दोघांना गंडा घातला. हे दोघे लोकांना सोशल मीडियावरून गुंतवणुकीचे सल्ले देत. छोटी गुंतवणूक करून मोठा मोबदला मिळेल अशी बतावणी ते सोशल मीडियावरून जाहिराती देत त्यानंतर लोकांची फसवूणक करत.

दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा समजलं की, या आरोपी लोकांनी दोन वर्षाच्या काळात ८४ बँक खात्यातून ८५४ कोटी पैसे वळवले होते. बंगळुरूच्या पोलिसांना या बँक खात्याची माहिती झाली आणि त्यांनी हे खाती गोठलं तेव्हा फक्त ५ कोटी रुपये या खात्यांमध्ये शिल्लक होते. सायबर क्राइम पोलिसांनी जेव्हा या घोटाळ्याची सखोल तपास केला तेव्हा भारतभरातून तब्बल ५,०१३ प्रकरणे घडकीस आली. हे बँक खात्याचा उपयोग पैसे ठेवण्यासाठी केला जात होता. संपूर्ण कर्नाटकात ४८७ गुन्हे दाखल आहेत.

यातील १७ प्रकरणे हे बंगळुरूमधील आहेत. दरम्यान पोलिसांना संशय आहे की, हे रॅकेट दुबईमधून चालवले जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून बंगळुरूमध्ये नेटवर्क तयार केले. या रॅकेटचा चीनशी संबंध असल्याचा संशय देखील पोलिसांना आहे. दरम्यान, मुख्य ऑपरेटर्सद्वारे ८४ संशयित खात्यांमधून ८५४ कोटी रुपये गेमिंग अॅप्स, USDT सारख्या क्रिप्टोकरन्सी, ऑनलाइन कॅसिनोमध्ये पैसा वळवला जात होता.तर रॅकेट चालवणारे हे दुबईत असून त्यांनी बंगळुरूमध्ये नेटवर्क तयार केलं असून ते एकमेकांना कधी भेटले नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान या घोटाळ्याचा दहशतवादी किंवा चीनशी कोणताच संबंध आढळला नाही. या घोटाळ्याचा तपास अजून चालू आहे. या घोटाळ्यातील प्रमुख आरोपींचा शोध घेतला जात असल्याचं पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी सांगितलं. या बनावट नेटवर्क तयार करणाऱ्यांना ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांच्या व्यवहारातून १ ते ३ टक्क्यांचे कमिशन मिळायचे. पैशांचे व्यवहार करताना केवायसी प्रक्रिया न करता व्यवहार केला जात, असं बंगळुरूचे सायबर गुन्हे अधिकारी हजीरेश तिल्लेदार यांनी सांगितलं.

दुबईस्थित ऑपरेटर्स हे अॅप्स पेमेंट गेटवे वापरणाऱ्या लोकांना बँकेचे क्लोन ओटीपी पाठवत. ग्राहकांचा मोबाईल नंबर बँकेशी जोडलेले असेल त्या नंबरवर हे हे क्लोन ओटीपी पाठवले जायचे. बंगळुरूच्या खोलीत आरोपी ८ मोबाईल सतत चालू ठेवत. याच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी, गेमिंग अॅप्स, ऑनलाईन कशिनोत पैसे टाकले जात. त्यानंतर ते पैसे काढले जातं.

ऑनलाइन कॅसिनो आणि गेमिंग अॅप्स हे मनी लाँड्रिंगचे मुख्य स्त्रोत आहे. कारण जिंकलेल्या पैशांचे कोणतेही रेकॉर्ड ठेवले जात नाहीत. अटकेतील आरोपीनुसार, ते स्वत:चे गेमिंग अॅप तयार करण्याची योजना आखत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाँडर केलेला पैसा आंतरराष्ट्रीय बँकांमध्ये पाठवला जात होता. विविध परदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याची हिस्ट्री तयार केली जात होती. घोटाळा करणाऱ्यांनी सॉफ्टवेअर, कॅसिनो, रिसॉर्ट आणि गारमेंट फॅक्टरीमध्ये या रॅकेटमधून कमावलेल्या पैशांपैकी १.३७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

आरोपी लोकांना छोटी गुंतवणूक करण्यास सांगत. सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सांगत. ग्राहकांना आधी सुरुवातीला १ हजार ते १० हजार रुपयांची गुंवणूक करायाला लावत. त्याचा मोबदला म्हणून प्रत्येक दिवशी १ हजार ते ५ हजार कमावण्याची संधी असल्याची बतावणी ते करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Jalgaon News : जळगाव शहरात कारमध्ये सापडली वीस लाख रुपयांची रोकड

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

Chhatrapati Sambhajinagar: रेडीको एनव्ही कंपनीमधील बॉयलरचा स्फोट; 3 कामगारांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT