सैन्यातून निवृत्त झालेल्या ८४ वर्षीय नेत्रचिकित्सकाच्या पत्नीचा मृतदेह सॉल्ट लेकमधील त्यांच्या घरी (Salt Lake home) मृतावस्थेत पडलेला आढळला. त्यामुळे स्थानिकांना मोठा धक्का बसला. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी हा खूनाचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट केलं (Doctor Kills Wife) आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. (Latest Crime News)
८४ वर्षीय सेवानिवृत्त आर्मी नेत्र शल्यचिकित्सक जदुनाथ मित्रा त्यांच्या सॉल्ट लेकमधील घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांची पत्नी मंदिरा बाथरूममध्ये मृतावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांच्या शरीरावर चाकूच्या अनेक जखमा दिसत होत्या. चाकूच्या अनेक जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला होता. तर जदुनाथ मित्रा खुर्चीवर झोपलेल्या अवस्थेत (Kolkata Crime News) होते. त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचं प्राथमिक तपासानंतर निदर्शनास आलं होतं. या घटनेसंदर्भात पोलिसांनी पतीने महिलेचा खून करून स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट केलं.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जदुनाथच्याही अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याने काही जखमा झाल्या होत्या. त्यालाही गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोलिसांनी सांगितलं की, या जोडप्याने त्यांच्या घरकामगारसाठी सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान त्यांच्या घराचे गेट नेहमीप्रमाणे उघडे ठेवले होते. त्यानेच पहिल्यांदा घटनास्थळी हे दृश्य (Kolkata Crime) होते. त्याच्या किंचाळण्यामुळे शेजारीचे लोकं गोळा झाले. विधाननगर नगरपालिकेचे नगरसेवक राजेश चिरीमारने पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती.
ही घटना सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान घडली होते. पोलिसांना जदुनाथकडे दोन चिठ्ठ्या सापडल्या (Crime News) होत्या. एका चिठ्ठीत बंगालीमध्ये त्याने पत्नीची हत्या करत स्वत: जीवन संपवल्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला होता. दुसरी चिठ्ठी चार पानांची इंग्रजीमध्ये होती. त्यामध्ये आरोपीने लिहिले होते की 'त्याने आयुष्यात अनेक चुका केल्या आहेत'. जदुनाथ मित्राने नुकतीच एक गाडी विकली होती. परंतु,त्यामध्ये काही कागदपत्रे चुकीची ठेवली होती. त्यामुळे त्याची पत्नी मंदिरा आणि कुटुंबातील एका सदस्याने त्याला फटकारलं होतं, असं या चिठ्ठीत (End Life ) लिहिलेलं होतं.
पोलिसांनी सांगितलं की, जदुनाथने काही मालमत्ता एक कोटी रुपयांना विकली होती. त्याला मोठा मालमत्ता कर भरावा लागला होता. त्याचा जवळच्या काही नातेवाईकांसोबत वाद झाला (Kolkata) होता. त्यांनी त्याला चांगला खरेदीदार मिळेपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला होता, असं पोलिसांनी सांगितलं.
जेवणाच्या टेबलावर रक्ताने माखलेला चाकू आणि टेबलाखाली दुसरा चाकू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं होतं. जदुनाथच्या पायाजवळ तिसरं धारदार शस्त्र सापडलं होतं. टेबलावर आरोपीने लिहिलेल्या चिठ्ठ्या सापडल्या होत्या. काही शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांनी मंगळवारी संध्याकाळी या जोडप्याचा वाद झाल्याचं ऐकू गेलं होतं.विधाननगरचे सीपी गौरव शर्मा म्हणाले, की,पोस्टमॉर्टम अहवालामुळे मृत्यूची नेमकी वेळ आणि पद्धत समोर येण्यास मदत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.