GST Crime News Saam Tv
क्राईम

GST Crime News: ६.४० कोटींची कर चोरी, जीएसटी विभागाने दोन संचालकांना केली अटक

GST News: महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी प्रकरणात ६ कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला आहे.

साम टिव्ही ब्युरो

GST Crime News:

महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी प्रकरणात ६ कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला आहे. बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सुरु असलेल्या घडक मोहिमेअंतर्गत कमलेश बाबुलाल जैन (वय ६१), आणि भावना कमलेश जैन (वय ६१) या दोन संचालकांना आज १६ एप्रिल रोजी अटक करण्यात आली, अशी माहिती राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

मे. मोनोपोली इनोव्हेशन्स प्रा.लि. या कंपनी विरोधात वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. कारवाई दरम्यान या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी व विक्री दाखवून ६.४० कोटी रुपयांची महसूल हानी केली आहे. या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी दाखवुन ३.२३ कोटी रुपयांची चुकीची कर वजावट घेऊन तसेच, मालाशिवाय फक्त बिले देवून ३.१७ कोटी रुपयांची शासनाची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आले.

महानगर दंडाधिकारी यांनी आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई राज्यकर सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त डी. के. शिंदे यांनी राबविली. या कार्यवाहीत सर्व राज्यकर निरीक्षकांचे महत्त्वाचे योगदान राहीले.

सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे २०२४-२५ या आर्थिक वर्षात पहिल्याच अटक कारवाईद्वारे कर चुकवेगिरी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : समृद्धी महामार्गावर ४० प्रवासी १० तास खोळंबले, नेमकं काय घडलं? वाचा

urad papad recipe: घरच्याघरी कुरकुरीत पापड कसे बनवायचे? ही आहे सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : ठाकरे सेनेने विश्वासघात केला, वंचितच्या माजी शहरप्रमुखाचा गंभीर आरोप

Tighee Movie: आई–मुलींच्या नात्याची हळवी कहाणी; सोनाली कुलकर्णीच्या 'तिघी' चित्रपटातील नविन गाणं प्रदर्शित

Mahashivratri Milk Mithai: महाशिवरात्रीसाठी दुधापासून बनवा या ७ टेस्टी आणि स्वीट मिठाई

SCROLL FOR NEXT