कोरोनाच्या पहिल्या महाभयंकर लाटेने जगाचं केलेलं नुकसान आठवून अजूनही धडकी भरते. आता त्याच कोरोनाचा नवा PJ 2.1 हा व्हेरियंट आढळून आला आहे. हा नवीन व्हेरियंट कॅनडात आढळला असून, याची लक्षणे फ्लू सारखीच असल्याने ओळख कठीण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या नव्या व्हेरिएंटचा अनेक देशांमध्ये प्रसार झाल्याचे समोर आले आहे. मे २०२६ मध्ये कॅनडातील ओंटारियो येथे या व्हेरिएंटची पहिली नोंद झाली. त्यानंतर अमेरिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलियासह काही देशांमध्येही त्याचा फैलाव झाल्याची माहिती समोर आली आहे.
या व्हेरिएंटची लक्षणे अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र कोरोना व्हेरिएंटप्रमाणेच यामध्ये पुढील लक्षणे दिसू शकतात. ताप येणे किंवा थंडी वाजणे, खोकला आणि घशात खवखव, नाक वाहणे किंवा बंद होणे,डोकेदुखी आणि अंगदुखी, थकवा आणि अशक्तपणा, काही रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे या व्हेरिएंटची असून नागरिकांनी घाबरून न जाता स्वच्छता राखावी आणि लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.