39 arrested near mohol while gambling 1crore 3 lakh material seized Saam Digital
क्राईम

मोहोळ : जुगार खेळणा-या 39 जणांना अटक, सुरत, रत्नागिरीसह बीडच्या व्यापा-यांचा समावेश; 1 कोटी 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Solapur Crime News : पोलिसांच्या विशेष पथकाला सोबत नेऊन धाड टाकली. तेव्हा इमारतीच्या दोन्ही मजल्यांमध्ये जुगार खेळला जात असल्याचे दिसून आले.

विश्वभूषण लिमये

मोहोळ तालुक्यातील अनगर येथे एका दुमजली जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष पथकाने धाड टाकून 38 जणांना पकडले. या कारवाईत रोख रकमेसह महागड्या मोटारी आणि किंमती स्मार्टफोन असा मिळून 1 कोटी 3 लाख 6900 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सुरत शहरासह रत्नागिरी, बीड येथील अनेक बडे व्यापारी आणि उद्योजक जुगार खेळताना सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एका इमारतीत तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक शुभमकुमार यांना मिळाली होती. त्यानुसार खात्री करून त्यांनी तेथे पोलिसांच्या विशेष पथकाला सोबत नेऊन धाड टाकली. तेव्हा इमारतीच्या दोन्ही मजल्यांमध्ये जुगार खेळला जात असल्याचे दिसून आले.

या धाडीत एकूण 39 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये रियाज बाशू मुजावर, दीपक गायकवाड (रा. मोहोळ), विनायक नीलकंठ ताकभाते, मनोज नेताजी सलगर, स्वप्नील कोटा, रोनक नवनीत मर्दा, हर्षल राजेंद्र सारडा, कृष्णा अर्जुन काळे (रा. सोलापूर), ओंकार विजय चव्हाण, अबरार करीम फकीर (रा. चिंचनाका, चिपळूण, जि. रत्नागिरी), फारूख याकूब शेख (रा. सुरत, गुजरात), एकनाथ भगवान चांगिरे (रा. परळी वैजनाथ, जि. बीड), विलास धर्मराज कडेकर (रा. बडवणी, बीड), नितीन गुंड (रा. अनगर) यांचा समावेश आहे.

या कारवाईत 2 लाख 26 हजार रूपये रोकडसह सहा महागड्या कार आणि 40 माेबाईल फोन असा एकूण 1 कोटी 3 लाख 6900 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर

वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

SCROLL FOR NEXT