35 tola gold ornaments stolen in kolhapur  saam tv
क्राईम

Kolhapur Crime News : काेल्हापुरात चोरट्यांची 'हाथ की सफाई', मंगल कार्यालयात अवघ्या दोन सेकंदात 35 तोळे सोन्यावर डल्ला

पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

नातेवाईकाच्या स्वागत समारंभासाठी कोल्हापुरात आलेल्या बेळगाव (belgaum) मधील एका महिलेचे सुमारे 35 तोळे सोन्याचे अवघ्या दोन सेकंदात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही कॅमे-याच्या फुटेजवरुन पाेलिस तपास करीत आहेत. (Maharashtra News)

कोल्हापुरातील शिरोली नाका (shiroli naka) इथं एका मंगल कार्यालयात लग्नानिमित्त स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या समारंभासाठी बेळगावचा केतन नंदेशवन, आई मीना व अन्य कुटुंबीय या समारंभाला आले होते.

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास स्वागत समारंभात या कुटुंबाला फोटो काढण्यासाठी बोलावल्यानंतर केतन यांच्या आई मीना यांनी त्यांच्या पायाजवळ पर्स ठेवली आणि फोटो क्लिक व्हायच्या आतच अवघ्या 2 सेकंदात ही पर्स अज्ञात चोरट्याने लांबवली. फोटो काढून येताच हा प्रकार नंदेशवन यांच्या ध्यानात आला. यानंतर सर्वांनी शोधाशोध केली. पण उपयोग झाला नाही.

या पर्समध्ये सुमारे 35 तोळे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल होता. दरम्यान याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आणि नातेवाईकांनी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

सीसीटीव्ही मध्ये चोरटा हा सूटबुटामध्ये येऊन चोरी करून गेल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान चोरीला गेलेल्या मुद्देमालाची बाजारभावाप्रमाणे किंमत २४ लाख रुपये इतकी होत आहे. पोलिस रेकॉर्डवर १५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या चोरीची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात (shahupuri police station kolhapur) झाली आहे. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hit And Run : प्रसिद्ध अभिनेत्रीनं दुचाकीला ठोकलं अन् घटनास्थळावरून पळाली; अपघाताचा व्हिडिओ समोर

Maharashtra Live News Update: मुंबई -गोवा महामार्गावर सलग 5 व्या दिवशी वाहतूक कोंडी, 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Stress Control: सावधान! मध्यरा‍त्रीपर्यंत झोप येत नाही, दररोज जागरण होतेय? तर हा गंभीर आजाराचा धोका

Gulab Jam Recipe: खव्याचा गुलाबजाम बनवण्याची सोपी पद्धत, तोंडात टाकताच विरघळेल

Budget Friendly Plan: सणासुदीचा भन्नाट प्लॅन, फक्त १ रुपयात मिळवा दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग

SCROLL FOR NEXT