Chhattisgarh Crime News Saam Tv
क्राईम

Shocking News : मित्रानेच घात केला! फिरायला घेऊन जातो सांगून घेऊन गेला; निर्जनस्थळी नेत मैत्रिणीवर बलात्कार

Chhattisgarh Crime News : छत्तीसगडमध्ये सीतापूर परिसरात २३ वर्षीय तरुणीवर तिच्याच मित्राने निर्जन ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी इंदल साई किंडो याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

छत्तीसगडमधील सीतापूर भागात २३ वर्षीय तरुणीवर तिच्याच मित्राकडून बलात्कार

आरोपीने फिरायला नेण्याच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार करून नाल्यात ढकलले

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली

घटनेनंतर परिसरात संताप

छत्तीसगड मधून मैत्रीला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे सीतापूर पोलीस स्टेशन परिसरात एका २३ वर्षाच्या तरुणीवर तिच्या मित्राने तरुणाने बलात्कार केला. धक्कदायक म्हणजे फिरायला नेण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला एका निर्जन परिसरात नेऊन जबरदस्तीने केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील चालता गावातील हर्रतिक्रा येथील रहिवासी २४ वर्षीय इंदल साई किंडो याने पीडितेला फिरायला येण्यास भाग पाडले. पिडीत तरुणी मित्र असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून आरोपीसोबत फिरायला गेली. मात्र फिरायला घेऊन जाण्याऐवजी आरोपी तिला तिला एका निर्जन भागात घेऊन गेला.

तिथे गेल्यावर पीडितेवर आरोपीने प्रथम तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. पीडिता नाही म्हणत असतानाही आरोपीने लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. नंतर तिने प्रतिकार केला म्हणून आरोपीने तिला मारहाण केली. शिवाय, त्याची वासना पूर्ण झाल्यानंतर आरोपीने तिला जवळच्या नाल्यात ढकलले आणि घटनास्थळावरून पळून गेला.

घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर पीडितेने गावकऱ्यांना आणि तिच्या कुटुंबियांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पीडितेला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे आरोपी इंदल साई किंडोविरुद्ध पोलिसांनी हल्ला, अत्याचार आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ एक पथक तयार केले आणि आरोपीला अटक केली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा? अनुभवी डॉक्टरांनी दिल्या ४ महत्वाच्या टिप्स, लगेचच जाणून घ्या

Gadchiroli Accident : गडचिरोलीत भीषण अपघात, जीप अन् दुचाकीची समोरासमोर धडक; २ तरुणांचा जागीच मृत्यू

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; पगार ४५००० रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

Crime: नवऱ्याने बायकोला जिवंत जाळलं, घराचा दरवाजा बंद करून काढला पळ; चंद्रपूर हादरले

Kitchen Tips : थंडीत भांडी धुताना हात गारठणार नाही, वापरा या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT