20 year old driver booked for hitting traffic constable in pimpri chinchwad saam tv
क्राईम

Pimpri Chinchwad : बंदोबस्तावर असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना भरधाव कारनं चिरडलं, युवकास अटक

Pimpri Chinchwad News : या घटनेत राहुल गंभीर झाले तर कल्याण भोसले हे किरकोळ जखमी झाले. प्रशांत कदम याच्यावर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad :

पिंपरी चिंचवड शहरात भरधाव कारचालकाने बंदोबस्तावर असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना चिरडले. या घटनेत दोन्ही वाहतूक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. एका पाेलिस कर्मचा-याची प्रकृती गंभीर बनल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आळंदी - दिघी वाहतूक विभागाचे अधिकारी व अंमलदार हे डी.वाय. पाटील कॉलेज जवळ वाहतूक नियमन कारवाई करीत हाेते. यावेळी प्रशांत कदम (वय 20) हा कार भरधाव वेगाने चालवीत असल्याचे आढळले. त्याच्या कारच्या सर्व काचा काळ्या (नियमबाह्य) हाेत्या.

वाहतूक अंमलदार राहुल मोटे व कल्याण भोसले यांनी प्रशांत कदम याला कार थांबविण्याचा इशारा केला मात्र प्रशांतने राहुल मोटे व कल्याण भोसले यांचे आदेश न पाळता जाणीवपूर्वक वाहतूक कारवाई टाळण्याच्या उद्देशाने त्याच्या कडील कार राहुल मोटे यांना जोरात धडक देवून गंभीर जखमी केले. (Maharashtra News)

या घटनेत राहुल गंभीर झाले तर कल्याण भोसले हे किरकोळ जखमी झाले. प्रशांत कदम याच्यावर दिघी पोलिस ठाण्यात (भादवि 307, 353 ,333, 279 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवसातून ४ वेळा नारळपाणी प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात?

Shocking: शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचा लैंगिक छळ, रात्री व्हिडिओ कॉल करायची अन्...; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra Live News Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमेच्या पाणी पातळीत वाढ,भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

Ganapati Special Train : खुशखबर! कोकणासाठी आणखी ४४ रेल्वे, कधी धावणार, कुठे कुठे थांबणार?

Bhandara Police : संभाजीनगरातून वाहन चोरी करत प्रतिबंधित डोडा वाहतूक; भंडारा पोलिसांकडून कारवाई, राजस्थानचे चोघे ताब्यात

SCROLL FOR NEXT