Navi Mumbai News Saam Tv
क्राईम

Shocking News : नवी मुंबई हादरली! हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या तरुणीने इमारतीच्या १०व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत तळोजा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीने दहाव्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. पोलिस तपास सुरू असून आत्महत्या की घातपात याचा शोध घेतला जात आहे.

Alisha Khedekar

तळोजा येथील इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून अल्पवयीन मुलीने उडी मारून आत्महत्या केली

मुलगी पनवेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करत होती

आई-वडील नसताना घरात एकटी असताना आत्महत्या केली

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तपास सुरू आहे

नवी मुंबईतून धक्कदायक बातमी समोर आली आहे. तळोजा येथील एका इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून अल्पवयीन मुलीने आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. सदर घटना ही रविवारी दुपारच्या सुमारास घडली असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर मृत मुलगी पनवेलमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होती. ती तिच्या पालकांसोबत इमारतीच्या १० व्या मजल्यावर राहत होती. तिची मोठी बहीण पुण्यात काम करते आणि आठवड्याच्या शेवटी तिच्या पालकांना भेटायला येते. तिचे वडील एका खाजगी कंपनीत काम करतात. २६ ऑक्टोबर रोजी, तिचे वडील कामावर गेले होते आणि तिची आई तिच्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी सातारा येथील तिच्या मूळ गावी गेली होती. यादरम्यान रविवारी ती एकटीच घरी होती.

घरात कोणीही नसल्याचं बघून या मुलीने घरातील बाल्कनीत जाऊन खाली उडी मारली. या घटनेनंतर इमारतीतील नागरिक परिसरात जमले. इमारतीतील घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात्र या मुलीने उडी का मारली? ही आत्महत्या होती की घातपात हे अद्यापही कळू शकलेलं नाही. पोलीस या घटनेचा तपास करत असून मृत मुलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT