Rajsthan News Saam tv
क्राईम

Shocking : लग्न होत नव्हतं, डोक्यात शिरलं अंधश्रद्धेचं भूत; ४ मावशींनी केली १६ दिवसांच्या भाच्याची हत्या

Rajsthan News : राजस्थानातील जोधपूरमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली चार मावशींनी मिळून १६ दिवसांच्या निरागस बाळाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलांना ताब्यात घेतलं आहे.

Alisha Khedekar

जोधपूरमध्ये १६ दिवसांच्या बाळाची अंधश्रद्धेतून निर्घृण हत्या

चार मावशींनी मिळून चिमुकल्याला जमिनीवर आपटून केलेली हत्या

लग्न न होताच अंधश्रद्धेच्या वाटेला जाऊन घेतला भयानक निर्णय

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, आरोपी ताब्यात

राजस्थानमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. 'माय मरो आणि मावशी जगो' अशी बोली भाषेतील एक म्हण प्रचलित आहे. मात्र याच मावशीने चक्क १६ दिवसांच्या चिमुकल्या बाळाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कदायक म्हणजे या बाळाच्या चार मावशांनी मिळून हे कृत्य केल्याचं उघड झालं आहे. लग्न होत नसल्याने अंधश्रद्धेला बळी पडून ही घटना घडली. या दुर्घटनेत चिमुकल्या बाळाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना राजस्थानातील जोधपूरमध्ये पंचबत्ती नेहरू कॉलनीत शुक्रवारी रात्री घडली आहे. या घरात राहणाऱ्या ४ महिलांनी मिळून त्यांच्याच बहिणीच्या १६ दिवसांच्या बाळाला अमानुष मारहाण केली. या बाळाला जमिनीवर आपटून मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या चारही महिला बाळाच्या मावशी असून या चौघींच लग्न होत नसल्याने अंधश्रद्धेला बळी पडून टोकाचं पाऊल उचलले असल्याचं समोर आलं आहे.

या घटनेनंतर बाळ कुठेच दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला मात्र तो कुठेच दिसला नाही. सगळं घर शोधल्यावर कुटुंबीयांना एका ठिकाणी बाळ जमिनीवर निपचित पडलेलं आढळलं. यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेलं, मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मृत बाळाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असता पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला.

पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली असता बाळाच्या ४ मावशींनी मिळून हे अमानुष कृत्य केल्याचं उघडकीस आलं. मृत मुलाच्या वडिलांनी सांगितलं की त्यांच्या पत्नीच्या ४ बहिणींचं लग्न होत नव्हतं त्यामुळे त्यांनी अंधश्रद्धेचा मार्ग निवडला. या अंधश्रद्धेतून बळी देण्यासाठी या चौघींनी मिळून बाळाचा जीव घेतला. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांनी या चौघींना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात मुक्काम करणार

Ajit Pawar Death: अजित पवारांबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

Mumbai Railway : मुंबई रेल्वेचा मोठा निर्णय! प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 'तिसरा डोळा'; नेमकं प्रकरण काय?

Toe Rings Design: नव्या नवरीसाठी जोडव्यांच्या सुंदर आणि नाजूक 5 डिझाईन्स

Face Yoga Benefits: फेस योगा करण्याचे फायदे काय? कधी करावा फेस योगा?

SCROLL FOR NEXT