Jharkhand Crime Saam Tv News
क्राईम

Shocking: १३ वर्षांच्या मुलीचं अपहरण, ३ दिवस घरात डांबून ठेवत बलात्कार, VIDEO बनवत...

Jharkhand Crime: झारखंडमध्ये १३ वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. आरोपीने तिला ३ दिवस घरात डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Priya More

झारखंडमध्ये १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यात ही घटना घडली. १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर ३ दिवस बलात्कार करण्यात आला. एवढेच नाही तर आरोपीने पीडित मुलीचा व्हिडिओही बनवला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेमुळे झारखंडमध्ये खळबळ उडाली असून राजकारण चांगलेच तापले आहे.

पीडितेच्या वडिलांनी या प्रकरणी कोलेबिरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, १३ वर्षांची मुलगी १६ जुलै रोजी रात्री ९ वाजता अचानक गायब झाली. गावकऱ्यांसह त्यांनी सगळीकडे तिचा शोध घेतला पण ती काही सापडली नाही. ३ दिवसांनी १९ जुलै रोजी ती घरी परत आली. तेव्हा तिने तिच्या कुटुंबियांना तिच्यासोबत घडलेल्या भयंकर घटनेबद्दल सांगितले. आरोपीने तिला १६ जुलै रोजी फोन करून घराबाहेर पडण्यास सांगितले. जर तिने तसे केले नाही तर तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरून ती बाहेर आली.

घाबरून पीडित मुलगी घराबाहेर गेली आणि आरोपीने तिला जबरदस्तीने त्याच्या घरी नेले. आरोपीने तिला ३ दिवस आपल्या घरात डांबून ठेवलं आणि तिच्यावर ३ दिवस वारंवार बलात्कार केला. पीडितेने पुढे आरोप केला की, त्या मुलाने तिला तीन महिन्यांपूर्वी जबरदस्तीने एका बागेत नेले होते. आरोपीने तिथेही तिच्यावर बलात्कार केला होता. यादरम्यान आरोपीने तिचे अश्लिल व्हिडिओ बनवले होते. आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करण्यासाठी हे फोटो आणि व्हिडिओ वापरत होता. याच व्हिडीओद्वारे त्याने पीडितेचे अपरहण करून तिच्यावर ३ दिवस बलात्कार केला.

सिमडेगाचे एसपी मोहम्मद अर्शी यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या कुटुंबाने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली. पीडिता आणि आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. रविवारी पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी झारखंडमधील वातावरण चांगलेच तापले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, VIDEO

Pune: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रमी खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; पुण्यात खळबळ

Malavya Rajyog 2025: 50 वर्षांनंतर चमकणार 'या' राशींचं नशीब; मालव्य आणि बुधादित्य राजयोग मिळवून देणार धनलाभ

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

SCROLL FOR NEXT