Teacher Fall In Love With Student Saam Digital
क्राईम

Teacher Fall In Love With Student: शिक्षिका पडली १० वीतील विद्यार्थ्यांच्या प्रेमात, बापाने घेतली पोलीस स्थानकात धाव

Kanpur City's Famous School Story: कानपूर कानपूर शहरातल्या एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचा कारनामा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Teacher Fall In Love With Student

प्रेमाचं वय अडचण ठरत नाही की आणखी काही. म्हणूनच प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. मात्र कधी कधी प्रेम काही नैतिक, कायदेशी गोष्टी टाळून पुढे जातं तेव्हा त्यावरचे आक्षेपही वाढत जातात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार सध्या उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरात घडला आहे. कानपूर शहरातल्या एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षिका चक्क १० वी तील विद्यार्थ्यांच्या प्रेमात पडली आहे. मात्र या मुलाच्या पित्याने ज्या प्रकारची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केलेय, त्यानुसार शिक्षिकेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शिक्षिका या विद्यार्थ्याला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अश्लील चॅटिंग करत असून धर्म परिवर्तन करण्यासाठी दबावही आणत आहे. विद्यार्थ्यांच्या पित्याने यासंदर्भात सहाय्यक अधीक्षकांकडे तक्रार केल्यांनतर संबंधित पोलीस स्थानकाला प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वास्तविक, हे सर्व प्रकरण कानपूर शहरातल्या कैंट पोलीस स्थानकाच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळेतील आहे. उन्नावमधील एका व्यक्तीने एएसपी बृज नारायण सिंह यांना पत्र पाठवून याबाबत तक्रार केली आहे. या पात्रात असं म्हटलंय की, त्याचा मुलगा १० वी मध्ये शिकत आहे. मात्र, त्याच्या शाळेतील एक शिक्षिका त्याच्यासोबत रात्र-रात्रभर मोबाईलवर चॅटिंग करत असते. तसेच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत आहे. त्याचबरोबर ही शिक्षिका, तिचा पती आणि भाऊ तिघे मिळून आपल्या मुलाला धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान या व्यक्तीने आपल्या मुलाचे आणि शिक्षिकेच्या चॅटिंगचे स्क्रीन शॉट सुद्धा पाठवले आहेत.

यासंदर्भात माहिती देताना एसीपी म्हणाले, संबंधित व्यक्तीने आपल्या मुलाचे आणि शिक्षिकेच्या बोलण्याचे पुरावे दिले आहेत. मात्र धर्म परिवर्तना संदर्भात पुरावे मागितले होते, ते अद्याप देऊ शकलेले नाहीत. मुलाने चॅटिंग डिलीट केल्याचं कारण दिलं आहे. दरम्यान कैंट पोलीस स्थानकाला या प्रकरणी तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच शारीरिक संबंध आणि धर्म परिवर्तन करण्यासाठी दबावाबाबत तपास सुरू आहे. जी माहिती समोर येईल त्यावर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

जगातील सर्वात महागडा तांदूळ तुम्हाला माहितीये का? पाहा काय आहे किंमत

SCROLL FOR NEXT