सिटीझन रिपोर्टर

BREAKING | अपघातांची मालिका काही संपेना!

साम टिव्ही

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा दुधाचा टँकर पलटी झाला.

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टँकर पलटी होऊन जवळपास पन्नास फूट फरफटत गेला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर टँकर पलटी झाल्याने मुंबई कडे जाणारी एक लेन बंद करण्यात आली होती. तर इकडे नवी मुंबईतल्या तळोजा लिंक रोडच्या सुरूवातीला आज पहाटे खासगी बसला अपघात झालाय. या अपघातात 15 प्रवासी जखमी झालेत..जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. कोल्हापूरहून बदलापूरकडे जात असताना हा अपघात झालाय. रस्त्याच्या मधोमध असलेल्या अंडरपासच्या शेडला ही बस पहाटेच्या काळोखात जोरदार धडकली. तर धुळ्यात दुचाकीने बैलगाडीला दिलेल्या धडकेच दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे-धमाणे रस्त्यावर हा अपघात झालाय. भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने समोरून पुढे चाललेल्या बैलगाडीला मागच्या बाजूने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार लागला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झालाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT