parali police
parali police 
सिटीझन रिपोर्टर

सुरकत्या पडलेल्या चेहऱ्यावर, परळी पोलिसांनी फुलवलं हास्य

- सिद्धेश सावंत

बीड: मंदिर परिसरालाच जगण्याचा आधार बनवत, भीक मागून जमवलेले पैसे अचानक हरवल्याने, एका वृद्धाची चांगलीच दाणादाण उडाली. मात्र भीक मागणाऱ्या त्या व्यक्तीच्या सुरकत्या पडलेल्या चेहऱ्यावर, पोलिसांनी केवळ तीन तासात हास्य फुलविले. बीडच्या परळी येथील वैद्यनाथ मंदिराच्या (Parali Vaijnath) परिसरात, अनेक बेवारस अनाथ लोक भिकमागून आपला उदरनिर्वाह करतात. याच लोकांमध्ये बाबुराव नाईकवाडे नामक वृद्ध हे सुद्धा भीक मागून आपली उपजीविका भागवत आहेत. गेली कित्येक वर्षापासून त्यांनी याठिकाणी बसून भाविकांनी दिलेले पैसे जमा केले होते. हे जमा केलेले पैसे आपल्याकडून हरवले असल्याचं, बाबुराव नाईकवाडे यांच्या आज सकाळी लक्षात आलं. त्यांनी तात्काळ परळी शहर पोलीस (Parali Police) ठाणे गाठले अन पोलिसांना विनंती केली. (The beggar's lost money was returned by the police)

हे देखील पाहा

माझे पैसे हरवले असून ते मला मिळत नाहीत.यावर तात्काळ कसलाही विलंब न करता, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्ष पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे, शंकर बुड्डे, मधुकर निर्मळ या पथकाने शोधमोहिम सुरू केली. पोलिसांनी अधिक तपास करत, अवघ्या 3 तासात हरवलेले, तब्बल 1 लाख 72 हजार 290 एवढी रोकड शोधून काढली. वृद्ध बाबूराव नाईकवाडे यांच्या आयुष्यभराची जमवलेली रक्कम त्यांना सन्मानपूर्वक परत केली. यामुळे त्या सुरकुत्या पडलेल्या खिन्न अवस्थेतील बाबुराव नाईकवाडे यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. दरम्यान परळी शहर पोलिसांच्या या कामगिरीचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

Edited By : Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Shendge News | सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील वंचित कसे? शेंडगेंचा संतप्त सवाल

Today's Marathi News Live : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष वाढणार?

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; ७ दिवसांत पोटावरील चरबी कमी होईल

Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : उज्ज्वल निकम यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार? शिवतीर्थावर चर्चा सुरू

CSK vs PBKS: चेन्नईच्या पराभवाचं नेमकं कारण काय? ऋतुराज गायकवाडने केला खुलासा

SCROLL FOR NEXT