प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा स्टायलिश स्कूटरसाठी ओळखली जाते. Yamaha Ray ZR 125 ही या सेगमेंटमध्ये कंपनीची हाय मायलेज असलेली स्कूटर आहे. ही स्कूटर ड्युअल टोन कलरमध्ये येते. कंपनीचा दावा आहे की, ही स्मार्ट स्कूटर रस्त्यावर सहज 49 kmpl पर्यंत मायलेज देईल.. बाजारात ही स्कूटर TVS Ntorq 125, Suzuki Avenis 125 आणि Honda स्कूटरशी स्पर्धा करते. याच स्कूटरच्या किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
Yamaha Ray ZR 125 रुपये 87080 च्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. स्कूटरचे टॉप मॉडेल 98674 हजार रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या हाय पॉवर स्कूटरमध्ये 5.2 लीटरची इंधन टाकी आहे. यात ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील ग्राहकांना मिळेल.
यामाहा स्कूटरमध्ये 125 cc इंजिन असून याचे वजन 99 किलो आहे. कंपनी याचे 6 प्रकार आणि 12 रंग पर्याय ऑफर करते. ही स्कूटर 8.04 BHP पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क जनरेट करते. याची सीटची उंची 785 मिमी आहे.
यात ग्राहकांना कार्बन ब्रेकिंग सिस्टम, एलईडी हेडलाइट आणि टेललाइट, साइड स्टँड आणि इंजिन कट-ऑफ स्विच, 21 लिटर अंडरसीट स्टोरेज सिस्टम आणि यूएसबी चार्जर आणि सिम्पल हँडलबार सारखे फीचर्स मिळतील.
Yamaha Ray ZR 125 मध्ये ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. आरामदायी प्रवासासाठी स्कूटरमध्ये रुंद सीट आणि हेवी सस्पेन्शन पॉवर आहे. स्कूटरमध्ये एअर-कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे लांबच्या मार्गावर हाय परफॉर्मन्स देते. Ray ZR 125 देखील हायब्रिड व्हर्जनसह येते. ज्यामध्ये अतिरिक्त पॉवरसाठी इलेक्ट्रिक मोटर दिली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.