Women Success Story meta ai
बिझनेस

Women Success Story : पतीची साथ सुटली, वडिलांची सावली हरपली; मुलीसाठी लढली अन् पालघर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड

Inspirational Story : नवरा आणि वडिलांचं निधन, मुलीची जबाबदारी आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही आसमा जाफर आतार यांनी जिद्द सोडली नाही. नोकरीसोबत अभ्यास करून पवित्र पोर्टलद्वारे पालघर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड मिळवली.

Sakshi Sunil Jadhav

प्रतिनिधी, अक्षय गुंड

कधी कधी आयुष्य आपल्यासमोर अशी संकटं उभी करतं, ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. आसमा जाफर आतार यांच्या आयुष्यातही असंच काहीसं घडलं. लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांत पतीचं निधन झालं आणि त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत वडिलांचंही छत्र हरपलं. एका बाजूला लहान मुलगी, तर दुसऱ्या बाजूला कुटुंबाची जबाबदारी… पण आसमा खचल्या नाहीत. मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी पुन्हा शिक्षण आणि नोकरीचा मार्ग धरला. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अखेर त्यांनी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पालघर जिल्हा परिषदेत शिक्षिका होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

आसमा यांनी डी.एड.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उपळाई येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयात विद्यादानचे कार्य केले. त्यानंतर पुण्यातील मोहसीन मणेर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संसाराच्या वेलीवर एक मुलगी आल्यानंतर त्या पूर्णपणे कुटुंबात रमल्या. परंतु, लग्नाला पाच वर्षे पूर्ण होण्याआधीच पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. या धक्क्यातून आतार आणि मणेर कुटुंब सावरत असतानाच, अवघ्या पाच महिन्यांत आसमा यांचे वडील जाफर आतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

पती आणि वडील अशा दोघांचाही आधार एकापाठोपाठ एक निघून गेल्याने आसमा यांच्यासमोर भविष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला. सासरची परिस्थितीही बिकट होती; सासरे आजारपणामुळे एका जागेवरून हालू शकत नव्हते. अशा वेळी सासू, सासरे आणि बहिणींनी आसमा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत "लहान मुलीच्या भविष्यासाठी तुला लढायचे आहे," असा आधार दिला. त्यांच्या प्रेरणेने आसमा यांनी पुण्यात एका खासगी संस्थेत कंत्राटी शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

नोकरी करत असतानाच त्यांनी खंड पडलेला अभ्यास पुन्हा अत्यंत जिद्दीने सुरू केला. घरात कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना आणि कोणताही मोठा सामाजिक-आर्थिक आधार नसताना केवळ स्वतःचे कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी शिक्षक भरतीची परीक्षा दिली. 'पवित्र पोर्टल'च्या प्रक्रियेतून अखेर त्यांची पालघर जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून निवड झाली.

एका सामान्य घरातील स्त्रीने दुःखाचा डोंगर पार करत मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या हजारो महिलांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल उपळाई बुद्रूकसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT