Know About Youtuber Dhruv Rathee in Marathi Saam TV
बिझनेस

Youtuber Dhruv Rathee Earning: युट्यूबच्या माध्यमातून दरमहा कमवतो ४८ लाख; कोण आहे युट्यबर ध्रुव राठी?

साम टिव्ही ब्युरो

तुषार ओव्हाळ

Dhruv Rathee News:

ध्रुव राठीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एक एक्सप्लेनर व्हिडीओ बनवलाय. तो व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झालाय. युट्यबवर या व्हिडीओला आतापर्यंत एक कोटीहून अधिक व्हुव्ज मिळालेत. तर ट्विटरवरही ध्रुवचा हा व्हिडीओ ट्रेंड होतोय. पण कोण आहे ध्रुव राठी, त्याचा व्हिडीओ का व्हायरल होतोय? युट्युबवर व्हिडीओ पोस्ट करून ध्रुव किती पैसै कमावतो? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतात हुकुमशाही सुरू झालीये का? असा सवाल करत ध्रुवने एक Explainer Video बनवलाय. या व्हिडीओमध्ये ध्रुवने केंद्र सरकारकडून कशा प्रकारे यंत्रणांचा गैरवापर होतोय यावर भाष्य केलंय. 23 फेब्रुवारीला ध्रुवने आपल्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केलाय. त्यानंतर या व्हिडीओला आतापर्यंत एक कोटी 33 लाखहून अधिक Views मिळालेत.

1994 साली हरयाणात ध्रुवचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याला व्हिडीओ बनवायला आवडायचे. त्याचे वडिल मलेशियात नोकरी करायचे. ध्रुवचे वडील ऑनलाईन भारतात आपल्या कुटुबीयांशी संवाद साधायचे. 9 ते 10 वर्षांपासून ध्रुवला Computer आणि Internet चा Access मिळाला.

ध्रुवने दिल्ली पब्लिक स्कूलमधून आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी ध्रुव जर्मनीत गेला. जर्मनीतून ध्रुवने मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केली. त्याच संस्थेतून ध्रुवने रिन्युएबल एनर्जी विषयांत मास्टर्स पूर्ण केलं.

2013 साली ध्रुवने आपलं युट्युब चॅनल सुरू केलं. या चॅनेलवर ध्रुवने आधी ट्र्रॅव्हल व्लॉग शेअर केले. ध्रुव काही ठिकाणी फिरायला जायचा, त्या ठिकाणची माहिती देतानाचे व्हिडीओ या चॅनेलवर तो पोस्ट करायचा. पण नंतर याच चॅनलवर ध्रुवने राजकीय आणि सामाजिक विषयांवर व्हिडीओ बनवायला सुरूवात केली.

त्यापैकी अमेरिकेचे अपोलो मिशन, बागेश्वर धाम, टायटॅनिकचे व्हिडीओ खूप चाललेत. ध्रुव ट्रेंडिग विषय घेऊन त्यावर रीसर्च करून व्हिडीओ बनवतो. त्यात तो उत्तम एडीटींगचाही वापर करतो. प्रेक्षकांना माहिती देणे आणि विचार करायला लावण्यावर त्याचा भर असतो.

ध्रुव किती पैसे कमावतो?

Free Press Journal नुसार ध्रुव व्हिडीओ बनवून महिन्याला 48 लाख रुपये कमावतो. ध्रुवची वर्षाची कमाई ही 27 कोटी रुपये इतकीये. ध्रुव फक्त Explainer Video नाही बनवत. त्याचा Travel Vlog साठी एक चॅनेल आहे. तर Youtube Shorts चा आणखी एक चॅनेल आहेत.

ध्रुव फक्त Explainer Video बनवून पैसे नाही कमावत. ध्रुव आपल्या व्हिडीओमधून कुकू FM, Artificial Integelence चे Course, Academic Course च्या व्हिडीओची जाहिरातसुद्धा करतो. या जाहिरातींमधूनही त्याला चांगले पैसे मिळतात. इतकंच नाही तर ध्रुवने Management & Productive आणि Chat GPT वरही काही Course Develope केले आहेत. हे कोर्स शिकवून ध्रुव पैसे कमावतो.

ध्रुव हे व्हिडीओ जरी भारतीय प्रेक्षकांसाठी बनवत असला तरी तो भारतात राहत नाही. ध्रुव शिकण्यासाठी जर्मनीत गेला होता. तेव्हा त्याची ओळख जुलिया या तरुणीशी झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्नसुद्धा केलं. ध्रुव जर्मनीत राहून हे व्हिडीओ बनवतो. ध्रुवने DW सारख्या चॅनेलसोबत अन्य काही व्हिडीओ देखील बनवलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT