Who is eligible for Ujjwala scheme Saam Tv
बिझनेस

PM Ujjwala Yojana: स्वस्त सिलिंडर मिळविण्यासाठी तुम्हीही उज्ज्वला योजनेंतर्गत अर्ज करू शकता का? जाणून घ्या

Who is eligible for Ujjwala scheme: स्वस्त सिलिंडर मिळविण्यासाठी तुम्हीही उज्ज्वला योजनेंतर्गत अर्ज करू शकता का? जाणून घ्या

Satish Kengar

Who is eligible for Ujjwala scheme? Know complete information in Marathi:

केंद्र आणि राज्य सरकारमार्फत अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असून त्याद्वारे प्रत्येक गरजू व गरीब वर्गाला लाभ दिला जातो. उदाहरणार्थ, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिले जात आहेत. त्यामुळे महिलांना लाकूड गोळा करून अन्न शिजवावे लागत नाही. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यासही मोठी मदत होत.

जर आपण या सिलिंडरच्या किंमतीबद्दल बोललो, तर या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या सिलिंडरची सध्याची किंमत 600 रुपये आहे. अशातच तुम्हीही या योजनेत सहभागी होऊन लाभ घेण्याचा विचार करत असाल तर, यासाठी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही? हे तुम्हाला आधी जाणून घ्यावे लागेल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणते लोक आहे पात्र?

  • तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे.

  • जर तुम्ही स्त्री असाल.

  • तुमच्या घरात आधीपासून एलपीजी कनेक्शन नसेल.

  • जर तुमच्याकडे बीपीएल कार्ड असेल आणि नाव बीपीएल यादीत असेल.

  • जर तुम्ही शिधापत्रिकाधारक असाल तर इ. (Latest Marathi News)

तुम्ही याप्रमाणे अर्ज करू शकता:-

  • जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. pmuy.gov.in/index.aspx

  • त्यानंतर येथे तुम्हाला 'Apply for New Ujjwala 2.0 Connection' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला एचपी, इंडेन किंवा भारत गॅसमधून कोणताही एक वितरक निवडावा लागेल.

  • आता तुम्हाला 'Register Boat' वर क्लिक करून माहिती भरावी लागेल आणि नंतर लॉगिन करावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रेही पोर्टलवर अपलोड करावी लागतील.

  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी केली जाते.

  • सर्व काही बरोबर आढळल्यास, तुम्हाला नवीन गॅस कनेक्शन दिले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT