8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: ८ व्या वेतन आयोगाबाबत कधी निर्णय होणार? कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या सविस्तर

8th Pay Commission News: आठवा वेतन आयोग २०२६ मध्ये लागू होणार आहे. त्याआधी आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ते जाणून घ्या.

Siddhi Hande

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती. आठव्या वेतन आयोगाच्या घोषनेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला होता. ८ वा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू केला जाईल. याची घोषणा १७ जानेवारी रोजी केली होती. आता लवकरच यासाठी समिती स्थापन केली जाईल.

८ व्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली जाईल. ही समिती कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारस करेन. आठव्या वेतन आयोगाची घोषणा होऊन खूप दिवस झाले. तरीही अद्याप समिती स्थापन झाली आहे.

मागच्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर जून २०२५ पर्यंत आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली जाईल.मागील वेतन आयोगाच्या वेळी घोषनेनंतर २ ते ५ महिन्यांच्या आत समिती स्थापन केली जाते.

७ व्या वेतन आयोगाच्या वेळी समिती ५ महिने आधी स्थापन केली होती. त्यामुळे आताही समिती जून महिन्यात स्थापन केली जाण्याची शक्यता आहे.

सरकार दर दहा वर्षांनी वेतन आयोग लागू करतात. त्यामुळे दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली जाते. ही समिती कर्मचाऱ्यांच्या पगारातील बदलासाठी शिफारस करते. याच समितीच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाणार आहे.

वेतन आयोगाची समिती शिफारसी करतात. त्यानंतर सरकार एक टीम बनवून शिफारसीबाबत चौकशी करते. त्यानंतर अंतिम निर्णय हा कॅबिनेटमध्ये होतो. त्यानंतर हा निर्णय सर्व विभागांमध्ये लागू केला जातो.

आठवा वेतन आयोग लागू केल्यानंतर वेतन आणि भत्त्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. महागाईपासून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे.

८ व्या वेतन आयोगानुसार बेसिक सॅलरी १८००० रुपयांवरुन ३७,४४० रुपये होऊ शकते.यावेळी फिटमेंट पॅक्टर १.९२ ते २.०८ च्या मध्ये असू शकतो. त्याचआधारे कर्मचाऱ्यांचा पगार ठरवला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

SCROLL FOR NEXT