8th Pay Commisson Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार? वाचा सविस्तर

8th Pay Commission Salary Hike: आठवा वेतन आयोग २०२६ पासून लागू केली जाईल. १ जानेवारी २०२६ पासून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत आता कर्मचाऱ्यांच्या पगारत मोठी वाढ होणार आहे. आठवा वेतन आयोग लागू होण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, अद्याप हा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणतीही प्रक्रिया सुरु झालेली नाही. परंतु हा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होऊ शकतो.

आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.या वेतन आयोगाअंतर्गत वाढीव पगार १ जानेवारी २०२६ च्या पगारात यायला हवा. मात्र, या प्रक्रियेला अजून वेळ लागण्याची शक्यता आहे.

पगार कितीने वाढणार? (How Much Salary Increase)

आठव्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर २.२८ ते २.८६ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ होऊ शकते. जर फिटमेंट फॅक्टर २.८६ झाला तर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही ५७,२०० रुपये होऊ शकते.

मिडिया रिपोर्टनुसार, आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात ४६,००० ते ५७,२०० रुपयांनी वाढ होऊ शकते. फिटमेंट फॅक्टर जेवढे वाढेल त्यावर तुमचा पगार किती वाढणार हे ठरणार आहे.

फिटमेंट फॅक्टर काय आहे? (What Is Fitment Factor)

फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर पगारवाढ ठरवली जाते. दर दहा वर्षांनी फिटमेंट फॅक्टर बदलला जातो. जर फिटमेंट फॅक्टर २.५७ असेल तर कर्मचाऱ्यांच्या पगारात ७,००० ते १८,००० रुपयांनी वाढ होणार आहे. पगारासोबतच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातदेखील वाढ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT