8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? बेसिक सॅलरी ५१,४८० होण्याची शक्यता

8th Pay Commission News: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार असा प्रश्न केंद्रिय कर्मचाऱ्यांना पडला आहे. दरम्यान, पुढच्या वर्षी आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्राने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती. त्यानंतर आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी हालचाली सुरु आहे. त्यामुळे लवकरच हा नवीन ८वा वेतन आयोग लागू होऊ शकतो. यामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी अन् पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये चांगलीच वाढ होणार आहे. जवळपास १ कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. दरम्यान, २०२६ पर्यंत आठवा वेतन लागू केला जाऊ शकतो.

आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? (When Will 8th Pay Commission Implemented)

आतापर्यंत दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. सहावा वेतन आयोग हा २०६ रोजी लागू करण्यात आला होता.त्यानंतर २०१६ मध्ये सातवा वेतन आयोग लागू केला. त्यानंतर आता २०२६ मध्ये आठवा वेतन आयोग लागू केला जाईल. ७ व्या वेतन आयोगाबाबत घोषणा ही २०१४ रोजी घोषणा केली होती. त्यानंतर दोन वर्षांनी हा वेतन आयोग कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला होता.

सातव्या वेतन आयोगाचा कालावधी हा १० वर्षांचा आहे. हा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे. त्यानंतर जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग मोजला जाईल. दरम्यान, या वेतन आयोग कधी लागू केला जाईल याबाबत घोषणा झालेली नाही. आठवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी समिती स्थापन केली जाते. ही समिती कर्मचाऱ्यांच्या पगाराचा आढावा घेते त्यानंतर त्यात किती वाढ करायची याचा प्रस्ताव देते. त्यानंतरच आठवा वेतन आयोग लागू केला जाईल.

आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार? (How Much Salary Will Increase Under 8th Pay Commission)

मिडिया रिपोर्टनुसार, आठवा वेतन आयोगामुळे फिटमेंट फॅक्टर २.२८ वरुन २.८६ पर्यंत वाढू शकतो. जर फिटमेंट फॅक्टर २.८६ झाला तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार जो १८००० रुपये आहे त्यांचा पगार ५१,४८० रुपये होऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या पगारात १८६ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

SCROLL FOR NEXT