बिझनेस

Whatsapp New Feature: फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, कमाल आहे व्हॉट्सअ‍ॅपचं डायलिंग फीचर

WhatsApp Direct Dialing: व्हॉट्सअ‍ॅपने यूजर्ससाठी नवीन फीचर आणले असून त्याद्वारे नंबर डायल करून थेट कॉल करता येईल. या सुविधेमुळे कॉल करणे आणि व्यवस्थापन करणे अधिक सोपे झाले आहे.

Dhanshri Shintre

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्ससाठी बऱ्याच काळापासून अपेक्षित असलेले एक महत्वाचे वैशिष्ट्य अखेर उपलब्ध करून दिले आहे. नवीन युनिफाइड कॉल हब फीचर आता iOS यूजर्ससाठी रोलआउट होत असून, यामुळे कॉलिंगचा अनुभव अधिक सोपा आणि सुलभ झाला आहे. प्लॅटफॉर्म अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या iOS आवृत्ती 25.27.73 मध्ये या कॉल हबची सुविधा दिसून येत आहे. यामुळे यूजर्सना कॉल करण्याआधी समोरच्याचा नंबर सेव्ह करण्याची आवश्यकता राहणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपच्या आताच आलेल्या या नवीन फिचरमध्ये इन-ॲप डायलरचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे यूजर्स थेट नंबर टाइप करून कॉल करू शकतात. हा डायलर फोनच्या पारंपरिक डायलरसारखाच आहे आणि तो अधिक सोप्या पद्धतीने वापरता येतो. शिवाय, या युनिफाइड कॉल हबमध्ये कॉल लिस्ट, कॉल शेड्यूल करण्याची क्षमता आणि निवडक संपर्कांना (फेव्हरेट्स) म्हणून चिन्हांकित करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. यामुळे यूजर्स आपला कॉल इतिहास पाहू शकतात, नियोजित कॉल्सची यादी तपासू शकतात आणि वारंवार कॉल केलेल्या संपर्कांना पटकन निवडू शकतात.

नवीन कॉल्स, टॅबमध्ये शेड्यूल केलेले कॉल्सही दाखवले जातील. म्हणून आता कामकाज सुलभ होणार आहे. फेव्हरेट्स टॅब हा या अपडेटचा आणखी एक महत्त्वाचा भाग ठरणार असून, यात यूजर्सना त्यांच्या जवळच्या किंवा दैनंदिन संपर्कांना सहज उपलब्ध ठेवण्याची सुविधा मिळेल.

सध्या ही सुविधा केवळ काही निवडक iOS यूजर्ससाठी उपलब्ध असून, इतरांना ती मिळण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. मात्र, या वैशिष्ट्याचा फायदा लवकरच अँड्रॉइड यूजर्सही मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. कॉलिंग अधिक सुलभ करण्याच्या या नव्या पावलामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर आणखी सोयीस्कर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandalachi Kheer Recipe : गोड खाण्याची इच्छा होतेय? फक्त १० मिनिटांत बनवा तांदळाची खीर

Gayatri Datar Photos: गायत्री दातारचं सौंदर्य, पाहताच जीव दंगला, रंगला...

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्यासोबत उठणं बसणं सुरुच राहणार - राज ठाकरे

Rohit Arya Encounter: रोहित आर्यचा एन्काऊंटर कोणी केला?

Rohit Arya:'शिक्षणमंत्र्यांनी' 2 कोटी थकवल्याचा आरोप; रोहित आर्य प्रकरणात दीपक केसरकर काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT