नवीन फीचरची चाचणी
व्हॉट्सअॅप सध्या एका नवीन फीचरची चाचणी करत आहे, ज्यामुळे युजर्सना मेसेज पाठवण्यासाठी फोन नंबरची गरज राहणार नाही. या फीचरनंतर यूजर्स युजरनेमद्वारे एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतील. त्यामुळे प्रायव्हसी राखत नंबर शेअर न करता संवाद साधणे सोपे होईल आणि व्हॉट्सअॅपचा वापर अधिक सुरक्षित बनेल.
टेलिग्रामप्रमाणे युजरनेमद्वारे लॉगिन
२००९ मध्ये सुरू झाल्यापासून व्हॉट्सअॅपपवर लॉगिनसाठी मोबाइल नंबर आवश्यक होता. मात्र, आता मेटा ही प्रणाली बदलण्याच्या तयारीत आहे. कंपनी व्हॉट्सअॅपपमध्ये टेलिग्रामप्रमाणे युजरनेमद्वारे लॉगिन करण्याची सुविधा आणण्याचे नियोजन करत आहे, ज्यामुळे यूजर्सना अधिक गोपनीयता आणि सोय मिळेल.
युजरनेम फीचर
हे नवीन फीचर नुकतेच समोर आले असून, WABetaInfo ने अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जनमध्ये त्याची चाचणी सुरू असल्याचे निरीक्षण केले आहे. यापूर्वीही व्हॉट्सअॅपच्या बीटा वर्जनमध्ये युजरनेम फीचर पाहायला मिळाले होते. मात्र यावेळी कंपनी ते अधिक स्थिर आणि वापरण्यास सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे.
युजरनेम तयार करताना काही अटी लागू
व्हॉट्सअॅप युजरनेम तयार करताना काही अटी लागू असतील. यूजर्सचेनाव “WWW” ने सुरू होता कामा नये. जेणेकरून वेबसाइटसारखा गोंधळ होऊ नये. प्रत्येक युजरनेममध्ये किमान एक अक्षर असणे आवश्यक आहे आणि यूजर्स a ते z मधील लहान इंग्रजी अक्षरे वापरून नाव तयार करू शकतील.
संख्या आणि विशेष चिन्हेही वापरू शकतील
अल्फाबेट्सशिवाय यूजर्स युजरनेममध्ये संख्या आणि विशेष चिन्हेही वापरू शकतील. हे फीचर व्हॉट्सअॅप अँड्रॉइड बीटा 2.25.28.12 मध्ये दिसून आले आहे. सेटिंग्जमध्ये युजरनेम आरक्षणाचा पर्याय दिला आहे. ज्यामुळे फीचर अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वी यूजर्स आपले युजरनेम सुरक्षित करू शकतील.
फीचर सर्व यूजर्ससाठी पूर्णपणे उपलब्ध नाही
सध्या हे फीचर सर्व यूजर्ससाठी पूर्णपणे उपलब्ध नाही. युजरनेम आरक्षण केल्याने फक्त तुमचे नाव सुरक्षित ठेवता येते, परंतु अजून या माध्यमातून मेसेजिंगची सुविधा उपलब्ध नाही. व्हॉट्सअॅप हे फीचर पुढील अपडेट्समध्ये पूर्णपणे लागू करण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.