Whatsapp Chat Saam Tv
बिझनेस

Whatsapp Chat: व्हॉट्सअ‍ॅपवर चुकूनही हे मेसेज किंवा व्हिडिओ पाठवू नका, होऊ शकतो तुरुंगवास

Whatsapp Rule: व्हॉट्सअॅपवर कोणतेही मेसेज किंवा व्हिडिओ शेअर करताना काळजी घ्या. तुम्ही जर कोणतेही आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा मेसेज शेअर करत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

Siddhi Hande

जगभरात असंख्य लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. व्हॉट्सअॅपचा वापर करुन आपण जगातील कोणत्याही काना कोपऱ्यात संपर्क साधू शकतात. व्हॉट्सअॅपवरुन काही सेकंदात कोणताही मेसेज पाठवू शकतात. दरम्यान, आता व्हॉट्सअॅपवर मेसेज करताना तुम्हाला सावध राहावे लागणार आहे. जर तुम्ही व्हॉट्सअॅपला काही वेगळे व्हिडिओ किंवा मेसेज पाठवले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. तुम्ही व्हॉट्सअॅपवर हे मेसेज कधीच पाठवू नका. w

व्हॉट्सअॅप हे प्रायव्हेट प्लॅटफॉर्म जरी असले तरीही त्यावर पाठवणाऱ्या मेसेजवर आयटी अॅक्ट आणि भारत दंड संहिता कलम लागू होऊ शकतात. त्यामुळे पोलिस तुमच्यावर कारवाई होऊ शकतात.

तुम्ही जर व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अडल्ट व्हिडिओ किंवा फोटो, जोक शेअर कर असाल तर हा एक गुन्हा आहे. अनेकजण मस्तीत हे असेल आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवतात. परंतु त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. तुमच्यावर आयटी कायद्याअंतर्गत कलम 67 अंतर्गत कारवाई होऊ शकते. तुम्हाला अटक होऊ शखते याचसोबत दंडदेखील भरावा लागेल.

जर तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रुपवर देशाविरोधी वक्तव्य असणारा मेसेज किंवा मीम शेअर करत असाल तर त्याबाबत पोलिसांना माहिती मिळेल. हा एक गुन्हा आहे. यामुळे तुमच्यावर अनेक कलमाअंतर्गत कारवाई होऊ शकते. जर तुम्ही कोणतेही हिंसा असलेले व्हिडिओ किंवा अश्लील फोटो पाठवले तर तुमच्यावर पोक्सोअंतर्गत कारवाई होऊ शकते. तुम्हाला जेलमध्येदेखील जावे लागेल.

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तुम्ही भाडंणाचे, मारामारीचे एमएमएस शेअर करत असाल तर हा गुन्हा आहे. तुमच्यावर आयटी कायद्याअंतर्गत कलम 66A आणि 153A कारवाई होऊ शकते. दरम्यान, व्हॉट्सअॅपचा वापर नेहमी चांगल्या कामांसाठी करा. तुम्ही कोणतेही असे व्हिडिओ किंवा मेसेज करु नका, ज्यामुळे इतरांना त्रास होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT