Aadhaar Card Saam Tv
बिझनेस

Aadhaar Card: मृत्यूनंतर Aadhaar Card, पॅन कार्डचे काय होणार? नियम वाचा

Aadhaar Card News: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटर आयडीचं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

Siddhi Hande

भारताचे नागरिक म्हणून आपल्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे आहे. अनेक सरकारी कामांसाठी आपल्याला या कागदपत्रांची गरज भासते. परंतु जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कागदपत्रांचे काय करावं असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

अनेकदा आपल्या कागदपत्रांचा अनेक लोक गैरवापर करतात. आपले ओळखपत्र दाखवून फ्रॉड करु शकतात. त्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यानंतर या कागदपत्रांचा गैरवापर करणे खूप सोपे होते. त्यामुळे या ओळखपत्रांचं काय करावं, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

वोटर आयडी (Voter ID)

प्रत्येक १८ वर्ष पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकाकडे वोटर आयडी असणे गरजेचे आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मतदार कार्ड रद्द करु शकतात. यासाठी तुम्हाला निवडणूक कार्यालयात जाऊन फॉर्म ७ भरावा लागेल. त्यानंतर तुमचे कार्ड रद्द होईल. मतदार ओळखपत्र रद्द करण्यासाठी त्या व्यक्तीच्या मृत्यूचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड (Aadhaar Card)

आधार कार्ड रद्द करण्याची कोणत्याही सुविधा अद्याप सुरु करण्यात आले नाही. परंतु तुम्ही आधार कार्ड लॉक करु शकतात. यासाठी तुम्ही uidai च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. तिथे आधार सर्व्हिसेसमधील लॉक किंवा अनलॉक बायोमेट्रिक्सवर क्लिक करा. त्यानंतर १२ अंकी आधार नंबर टाका. कॅप्चा कोड टाका. यानंतर ओटीपी टाका.ओटीपी टाकल्यानंतर डेटा लॉक किंवा अनलॉकचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन लॉक करा. यानंतर तुमचा डेटा लॉक होईल,

पॅन कार्ड (Pan Card)

पॅन कार्डधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याचे कार्ड परत करावे. यासाठी आयकर विभागाशी संपर्क करावा. पॅन कार्ड परत करण्यापूर्वी सर्व खाते दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करावेत किंवा बंद करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT