PM Vishwakarma Scheme Benefits SAAM TV
बिझनेस

PM Vishwakarma Scheme : ५ टक्के व्याजदरानं मिळणार कर्ज, काय आहे पीएम विश्वकर्मा योजना?

PM Vishwakarma Scheme Benefits : पीएम विश्वकर्मा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Saam TV News

PM Vishwakarma Scheme Benefits : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१६ ऑगस्ट) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात पीएम विश्वकर्मा योजनेला (PM Vishwakarma Scheme) मंजुरी देण्यात आली. पाच वर्षांच्या कालावधीसाठी १३ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद आहे. या योजनेमुळं सोनार, लोहार, धोबी, न्हावी आदींसह पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांच्या जवळपास ३० लाख कुटुंबाना लाभ होणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मोदींनी १५ ऑगस्टला पीएम विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती.

पीटीआयच्या वृत्तानुसार, विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि शिल्पकारांना 'पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र' आणि आयडी कार्डच्या माध्यमातून ओळख मिळणार आहे. योजनेंतर्गत ५ टक्क्यांच्या व्याजदराने १ लाख रुपये (पहिला हप्ता) आणि २ लाख रुपये (दुसरा हप्ता) कर्ज स्वरुपात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी दिली योजनेची माहिती

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयासंबंधी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. या योजनेंतर्गत दोन प्रकारचे कौशल्य विकास उपक्रम असतील. बेसिक आणि अॅडव्हान्स्ड. कौशल्य विकास प्रशिक्षणादरम्यान लाभार्थ्यांना प्रतिदिन ५०० रुपयांचे मानधनही दिले जाईल. लाभार्थ्यांना आधुनिक उपकरणे खरेदीसाठी १५ हजारांपर्यंतची आर्थिक मदतही दिली जाईल.

५ वर्षांत ३० लाख कुटुंबांना लाभ

पहिल्या वर्षात या योजनेंतर्गत ५ लाख कुटुंबांना लाभ दिला जाणार आहे. आर्थिक वर्ष २०२४ पासून २०२८ या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण ३० लाख कुटुंबांना लाभ दिला जाईल.

या पारंपरिक व्यावसायिकांना मिळणार लाभ

रिपोर्टनुसार, योजनेच्या सुरुवातीच्या काळात होडी, शस्त्रे, लोहार, हातोडा किंवा टूल किट तयार करणारे, टाळे तयार करणारे, सोनार, कुंभार, मूर्तीकार, टोपली, चटई, झाडू तयार करणारे, पारंपरिक पद्धतीने बाहुल्या, खेळणी तयार करणारे, न्हावी, धोबी, शिवणकाम करणारे आणि माशांचे जाळे तयार करणाऱ्या पारंपरिक व्यावसायिकांना लाभ दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT