eShram Yojna Saam Tv
बिझनेस

eShram Yojna : ई-श्रम योजना काय आहे? कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर

eShram card : ई-श्रम योजना २०२२ मध्ये सुरू करण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

eShram Yojna Registration

सरकारने नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना लाँच केल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे ई-श्रम योजना. ई-श्रम योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांना एकत्रित आणण्यासाठी काम करते. ही योजना २०२२ मध्ये सुरू करण्यात आली.

गरीब घरातील मजुरांना त्यांच्या कौशल्याच्या आधारे रोजगार निर्मिती करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत फेरीवाले, भाजी विक्रेते, घरगुती कामगार, लहान नोकरी करणारे तरुण यांना ई-श्रम योजनेचा लाभ घेता येणार आहे. जे लोक कर भरत असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

ई-श्रम कार्डचे फायदे

ई-श्रम कार्ड हे कामगार,मजुरांसाठी तयार केले जाते. केंद्र सरकारने जर कोणती योजना सुरू केली तर या कार्डच्या आधारे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. याचसोबत यामध्ये नोंदणी करणाऱ्यांना दोन लाख रुपयांचा अपघात विमा दिला जाईल.

या योजनेत १६ ते ५९ वय असणारे लोक नोंदणी करु शकतो. नोंदणी झाल्यावर तुम्हाला १२ अंकी युनिक नंबर दिला जाईल. त्याच्या साहाय्याने तुम्ही सरकारच्या अनेक योजनांमध्ये सहभागी होऊ शकता.

ई-श्रम कार्ड साठी असा करा अर्ज

  • ई-श्रम कार्ड तयार करण्यासाठी eshram.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • त्यानंतर Register या पर्यायावर क्लिक करा.

  • त्यानंतर आधार कार्डशी लिंक केलेला फोन नंबर टाका. त्यानंतर ओटीपी टाका.

  • फॉर्ममध्ये दिलेली माहिती भरा.

  • सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.

नोंदणीसाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. अर्ज करणाऱ्याकडे आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक हे कागदपत्रे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Accident : गडचिरोलीत भीषण अपघात, जीप अन् दुचाकीची समोरासमोर धडक; २ तरुणांचा जागीच मृत्यू

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; पगार ४५००० रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

Crime: नवऱ्याने बायकोला जिवंत जाळलं, घराचा दरवाजा बंद करून काढला पळ; चंद्रपूर हादरले

Kitchen Tips : थंडीत भांडी धुताना हात गारठणार नाही, वापरा या सोप्या टिप्स

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT