आपल्या देशात अनेक प्रकारच्या फायदेशीर आणि कल्याणकारी योजना सुरू आहेत. वेळोवेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपापल्या स्तरावर अनेक नवीन योजना सुरू करतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सखी योजना सुरू केलीय. पीएम मोदींनी पानिपत येथून या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेसाठी पात्र आहेत ते अर्ज करू शकतील आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतील. सखी योजनेसाठी कोण पात्र असेल ते जाणून घेऊ.
विमा सखी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश महिलांना सक्षम करणे आहे. ज्या महिलांचे वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान आहे. या योजनेत महिलांना प्रशिक्षण आणि आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे.
या योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळणार आहे.
अर्जदाराकडे मॅट्रिक, हायस्कूल, 10वी उत्तीर्णचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
ज्या महिलांचे वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान आहे अशा महिला अर्ज करू शकतील.
या विमा सखी योजनेत सहभागी झाल्यानंतर महिलांना आधीच्या ३ वर्षे प्रशिक्षण दिले जाईल. त्यात आर्थिक व्यवहाराचे ज्ञान दिलं जाईल. तसेच प्रशिक्षणादरम्यान महिलांना काही निश्चित रक्कम (सुमारे 2 लाखांपेक्षा जास्त) देखील दिली जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिला एलआयसी विमा एजंट म्हणून काम करू शकतील. तसेच बॅचलर पदवी उत्तीर्ण झालेल्यांनाही विकास अधिकारी बनण्याची संधी मिळणार आहे.
10वी उत्तीर्ण महिलांना दर महिन्याला दोन पॉलिसी विकण्याचे टार्गेट दिले जाईल, म्हणजे पहिल्या वर्षी दरवर्षी 24 पॉलिसीची विक्री करावी लागेल. या योजनेतून बोनस दिले जाईल. तसेच कमिशन म्हणून 48 हजार रुपये देखील दिले जातील. म्हणजेच एका पॉलिसीसाठी 4 हजार रुपये दिले जातील.
सर्वात आधी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
https://licindia.in/test2 येथे क्लिक केल्यानंतर 'Click Here For Bima Sakhi येथे क्लिक करावे लागेल.
यानंतर, अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि पत्ता इत्यादी भरावे लागले.
यानंतर तुम्हाला येथे इतर माहिती द्यावी लागेल, म्हणजेच तुम्हाला एलआयसी एजंट माहित असेल तर त्याची माहिती द्यावी लागेल.
त्यानंतर स्क्रीनवर दिला कॅप्चा भरावा लागेल.
त्यानंतर सबमिटच्या बटणावर क्लिक करून अर्ज भरावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.