Tax Rule Saam Tv
बिझनेस

Tax Rule: लग्नात मिळणाऱ्या भेटवस्तूंवर टॅक्स लागतो का? वाचा आयकर नियम काय सांगतो

Tax On Wedding Gifts: लग्नात मुलीला आहेरात खूप गोष्टी द्यायची परंपरा असते. परंतु या महागड्या वस्तूंवर इन्कम टॅक्स लागू शकतो. याबाबत काही नियम आहेत ते जाणून घ्या.

Siddhi Hande

भारतात लग्नाला खूप महत्त्व आहे. लग्नाला लाखो रुपयांचा खर्च केला जातो. लग्नात आहेरात अनेक गोष्टी मिळतात. काही गोष्टी या खूप महागड्या असतात. या लग्नात भेटवस्तू म्हणून दिल्या जाणाऱ्या गोष्टींवर इन्कम टॅक्स लागू होतो का असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे? आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.

लग्नात मिळणाऱ्या गिफ्टवर टॅक्स लागतो का? (Are Wedding Gifts Are Taxable?)

लग्नात मिळणार काही गोष्टींवर टॅक्स लागतो तर काही गोष्टींवर लागत नाही. या सर्व गोष्टी गिफ्ट कोणाकडून, कोणते आणि काय मिळाले आहे यावर अवलंबून असते. इन्कम टॅक्स अॅक्ट १९६१ अंतर्गत 56 (2)(X)अंतर्गत गिफ्ट्सवर टॅक्स द्यावा लागतो. परंतु लग्नात मिळणाऱ्या गिफ्टवर सूट देण्यात आली आहे. परंतु त्यासाठीही काही अटी आहेत. जर तुम्ही या अटींचे पालन करुन गिफ्ट देत असाल तरच तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. अन्यथा तुम्हाला टॅक्स भरावा लागेल.

इन्कम टॅक्स नियम (Income Tax Rule)

भारतीय आयकर कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीला एका आर्थिक वर्षात रोख रक्कम, मालमत्ता किंवा इतर कोणतीही वस्तू ५०,००० किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेची असेल तर ती करपात्र असते. परंतु लग्नात मिळालेल्या गोष्टींवर हा नियम पूर्णपणे लागू होत नाही. यासाठी काही वेगळे नियम आहेत.

कोणत्या भेटवस्तूंवर सूट आहे? (Which Gifts Are Tax Free)

  • वधू किंवा वराला मिळालेल्या भेटवस्तूंवर कर लागत नाही. ही भेटवस्तू नातेवाईकांनी दिलेली असो किंवा नसो. या गोष्टींवर टॅक्स लागत नाही.

  • ही सूट फक्त लग्नाच्या प्रसंगी मर्यादित आहे. लग्नाच्या आधी किंवा नंतर दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर कर लागतो.

  • ही सूट फक्त नवरा-नवरीसाठी आहे. कुटुंबातील इतर सदस्यांना ही तरतूद लागू होत नाही.

  • म्हणजेच जर लग्नात नवरदेवाला १ लाख रुपये गिफ्ट म्हणून दिले तर ते करमुक्त असणार आहे. परंतु हेच पैसे नवऱ्याच्या आईवडिलांना दिले तर त्यावर टॅक्स लागू शकतो.

कोणत्या वस्तूंवर कर नाही? (Which Wedding Gifts Are Non Taxable)

जर एखाद्या व्यक्तीला ५०,००० रुपयांची भेट मिळाली आणि ती व्यक्ती जवळची नातेवाईक नसेल तर त्या भेटवस्तूवर कर भरावा लागू शकतो. नातेवाईकांमध्ये पालक, भावंडं, आजी-आजोबा, सासरे, पती पत्नी, मुलांचा समावेश आहे.

आयटीआरमध्ये माहिती द्या (ITR Filling 2025)

जरी नवरा- नवरीला लग्नात गिफ्ट मिळालेल्या गोष्टींवर टॅक्स लागत नसेल तरीही याबाबत माहिती आयकर रिटर्नमध्ये द्यावी. पुढे जर तुम्हाला ही वस्तू विकायची असेल तर त्यासाठी अडचण येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT