Samsung Galaxy XCover 7 Saam Tv
बिझनेस

Samsung ने आणला रफ अँड टफ वॉटरप्रूफ फोन, उंचीवरून पडला तरी काही होणार नाही; मिळणार दोन वर्षांची वॉरंटी

Samsung Galaxy XCover 7: सॅमसंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपला जबरदस्त स्मार्टफोन Samsung Galaxy XCover 7 भारतात लॉन्च केला आहे.

Satish Kengar

Samsung Galaxy XCover 7:

सॅमसंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपला जबरदस्त स्मार्टफोन Samsung Galaxy XCover 7 भारतात लॉन्च केला आहे. कंपनीचा हा फोन मिलिटरी ग्रेड बिल्ड क्वालिटीसह येतो. हा फोन MIL-STD-810H द्वारे देखील प्रमाणित आहे. IP68 रेटिंग असलेला हा फोन बऱ्याच प्रमाणात वॉटरप्रूफ आहे.

हा फोन 1.5 मीटरपर्यंत उंचीवरून पडला तरी त्याला काही होणार नाही, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. कंपनी या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. हा फोन स्टँडर्ड आणि इंटरप्राइज या दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 27,208 आहे आणि इंटरप्राइजची किंमत 27,530 रुपये आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअरशिवाय यूजर्स हा फोन सॅमसंग कॉर्पोरेट स्टोअरमधूनही खरेदी करू शकतात. कंपनी फोनच्या इंटरप्राइझ एडिशनसह 12 महिन्यांचे नॉक्स सूट सबस्क्रिप्शन देत आहे. हा सॅमसंग फोन दोन वर्षांपर्यंतच्या वॉरंटीसह येतो. या सॅमसंग फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...  (Latest Marathi News)

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनी या फोनमध्ये 6.6 इंच फुल HD+ TFT LCD डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले सेफ्टीसाठी कंपनी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ देत आहे. फोन 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये Mali G57 GPU सह MediaTek Dimension 6100+ चिपसेट देत आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये LED फ्लॅशसह 50-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने हा कॅमेरा ऑप्टिमाइझ केला आहे, ज्यामुळे तो अनेक बारकोड आणि QR कोड स्कॅन करू शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फेस अनलॉक आणि नॉक्स सारख्या सेफ्टी फीचर्ससह या फोनची बॅटरी 4050mAh आहे. फोनमध्ये दिलेली बॅटरी रिमूव्हेबल आहे.

ही बॅटरी 15 वॅट चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि POGO पिन आहे. फोन IP68 रेटिंगसह येतो. फोन 1.5 मीटर पाण्यात 30 मिनिटांपर्यंत आरामात राहू शकतो. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 14 वर आधारित OneUI वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल सिम, 5जी, वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.3, जीपीएस, ग्लोनास आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत. 3.5mm हेडफोन प्रकार असलेला हा फोन डॉल्बी ॲटमॉसने सुसज्ज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT