Warivo CRX Saam Tv
बिझनेस

90km ची जबरदस्त रेंज, किंमत 79,999 रुपये; दैनंदिन वापरासाठी बेस्ट आहे 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर

Warivo Motor: तुम्ही जर तुमच्या खिशाला परवडणारी आणि दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Satish Kengar

जर तुम्ही दैनंदिन वापरासाठी तुमचा खिशाला परवडेल अशी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन Warivo Motor ने आपली नवीन हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ‘CRX’ बाजारात सादर केली आहे. दैनंदिन वापरासाठी ही एक चांगली स्कूटर सिद्ध होऊ शकते. यात आरामदायी सीट देण्यात आली आहे. Warivo CRX इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कंपनीने फक्त 79,999 रुपये ठेवली आहे.

Warivo CRX इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.3 kwh बॅटरी देण्यात आली आहे. जी पूर्ण चार्ज झाल्यावर इको मोडमध्ये 90 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. तर पॉवर मोडमध्ये ही स्कूटर 70-75 किलोमीटरची खरी रेंज देऊ शकते, असा दावाही कंपनीने केला आहे.

ही स्कूटर अॅडव्हान्स वॉटरप्रूफ, फायरप्रूफ आणि ब्लास्ट-प्रूफ बॅटरीने सुसज्ज आहे. जी टेम्परेचर सेन्सर्स आणि पॉवरफुल बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) सोबत या स्कूटरला जास्त गरम होण्यापासून वाचवते. याव्यतिरिक्त क्लाइमा-कूल तंत्रज्ञान लॉन्ग राइड दरम्यान बॅटरीची कार्यक्षमता अधिक काळ टिकवून ठेवते.

या स्कूटरमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. या स्कूटरचा टॉप स्पीड 55km/h आहे. या स्कूटरमध्ये 42 लीटरची बूट स्पेस आहे. ज्यात तुम्ही सहज दोन हेल्मेट ठेवू शकता. याशिवाय तुम्ही तुमची मोठी बॅगही ठेवू शकता. यात मोबाइल चार्जिंग पॉइंट (टाइप-सी आणि यूएसबी), 150 किलो लोडिंग क्षमता यासह बरीच फीचर्स आहेत.

या स्कूटरमध्ये एक मोठा डिजिटल कलर स्पीडोमीटरही देण्यात आला आहे. ज्यामध्ये बॅटरी स्टेटस, रेंज, स्पीडोमीटर, ओडोमीटर, राइडिंग मोडसह अनेक प्रकारची माहिती मिळते. या स्कूटरची डिझाइन स्पोर्टी आहे. यात एलईडी हेडलाइट, टर्न इंडिकेटर, एलईडी टेललाइट ग्राहकांना पाहायला मिळेल. ही स्कूटर पाच रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरचे वजन 102 किलो आहे. यात चांगल्या ब्रेकिंगसाठी कॉम्बी ब्रेक सिस्टम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT