वॉल्वो EX30 भारतात सप्टेंबरच्या अखेरीस लॉन्च होणार.
ऑक्टोबरपासून ग्राहकांना डिलिव्हरी सुरु होईल.
उत्पादन बंगळुरूतील होसाकोटे प्लांटमध्ये सुरु आहे.
वॉल्वो कार इंडिया जबरदस्त कार बाजारात उतरवणार आहे. ही इलेक्ट्रिक कार असून याची शानदार फीचर्स आहेत. इलेक्ट्रिक एसयूव्ही सप्टेंबरच्या अखेरीस किंमतीच्या तपशीलासह अधिकृतपणे लॉन्च करण्यात येणार आहे. या कारची किंमत काय असेल याची माहिती कंपनीकडून देण्यात आली नाहीये. ग्राहकांना कारची डिलिव्हरी ऑक्टोबर महिन्यापासून होईल. कर्नाटकातील बंगळुरू येथील होसाकोटे येथे EX 30 चे उत्पादन केले जात आहे.
ज्या ग्राहकांना कार खरेदी करण्याची इच्छा असेल ते KIFS वॉल्वो कार्स (अंधेरी पश्चिम आणि प्रभादेवी) येथे चाचणी ड्राइव्ह घेऊ शकतात. तसेच डिलिव्हरीच्या वेळी विशेष सवलती मिळवण्यासाठी कार प्री बुकिंग करू शकतात. दरम्यान ही स्वीडिश लक्झरी कार कंपनी असून वॉल्वोने भारतात २००७ प्रवेश केला होता. येथील ग्राहकांना आकर्षित करतील अशा डिझाइनच्या कारची निर्मिती केलीय.
सर्वात टिकाऊ आणि कमी कार्बन उत्सर्जन:
EX30 ही वॉल्वोची सर्वात टिकाऊ पूर्ण-इलेक्ट्रिक कार आहे. इतर कोणत्याही पूर्ण-इलेक्ट्रिक वॉल्वोपेक्षा कमी कार्बन उत्सर्जन करते.
पुनर्वापर केलेल्या सामग्रीचा वापर:
कारच्या अंतर्गत भागात पुनर्वापर केलेल्या डेनिम, पीईटी बाटल्या, अॅल्युमिनियम आणि पीव्हीसी पाईप्सचा वापर केला जातो.
उच्च सुरक्षा मानके आणि प्रगत तंत्रज्ञान:
EX30 ने युरो एनसीएपी सुरक्षा चाचणीमध्ये फाइव्ह स्टार मिळवले आहेत. त्यात इंटरसेक्शन ऑटो ब्रेक, डोअरिंग अपघात टाळण्यासाठी इशारा देते, त्यासाठी 5 कॅमेरे, 5 रडार आणि 12 अल्ट्रासोनिक सेन्सर्स यासारखी सुरक्षा साधने आहेत.
आकर्षक डिझाइन आणि पुरस्कार:
यात नवीन हरमन कार्डन साउंडबार संकल्पना आणि 12.3-इंची हाय-रिझोल्यूशन सेंटर डिस्प्ले कारमध्ये देण्यात आले आहे.
रेड डॉट पुरस्कार:
बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोडक्ट डिझाइन 2024 आणि वर्ल्ड अर्बन कार ऑफ द इयर 2024 यांसारखे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
EX 30 कारमधील बॅटरीला सुमारे 8-वर्षांची वॉरटी देण्यात आली आहे. स्टैंडर्ड फिटमेंट म्हणून बॉल बॉक्स चार्जरचा समावेश करण्यात आलाय. डिजिटल की प्लससह, फोन स्वतःच एक की म्हणून काम करते. ही सुविधा ग्राहकांच्या दृष्टीने सोयीस्कर आहे.
EX 30 सिंगल मोटरविषयी- विस्तारीत रेंज:
पॉवर: 272 एचपी
टॉर्क: 343 एनएम
बॅटरी: 69 फेडब्ल्यूएच सिंगल मोटर एक्सटेंडेड रेंज
बॅटरी प्रकार: Li-lon
एक्सेलरेशन : 0-100 किमी - 5.3 s
बॅटरी वॉरंटी : 8 वर्षे/160,000 किमी
टॉप स्पीड : ताशी 180 किमी
टॉप स्पीड : ताशी 180 किमी
डब्ल्यूएलटीपी रेंज : 480 किमी
फ्रंट स्टोरेज (फ्रंक): 7 लिटर्स
रिअर स्टोरेज (पाय ठेवायची जागा): 318 लिटर्स
ग्राऊंड क्लियरन्स (कर्ब वेट 1 व्यक्ती): 171 एमएम
वन पेडल ड्राइव्ह पर्याय
5 सभोवतालच्या प्रकाशाच्या संकल्पना आणि ध्वनी
नॉरडीको अपहोलस्ट्रे
अभिनव पद्धतीचा बॅटरी सुरक्षा पिंजरा
प्रगत ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम्स सेन्सर प्लॅटफॉर्मकरिता व्यवस्थित पॅकेज असलेले सेन्सर
एलईडी हेडलाईट मिड
सेफ स्पेस टेक्नॉलॉजी
गुगल बिल्ट-इन (गुगल असिस्टंट, गुगल प्ले, गुगल मॅप्स)
वॉल्वो कार्स अॅप ("ग्राहकांना डिलिव्हरी सुरू होईपर्यंत तयार होईल)
उच्च कामगिरी बजावणारी साऊंड सिस्टीम (1040W, 9 स्पीकर)
रिव्हर्सिंग कॅमेरा
-व्लाइंड स्पॉट माहिती प्रणाली सोबत क्रॉस ट्रॅफिक अलर्ट
-अनुकूलित क्रूझ कंट्रोल
-पार्क पायलट असिस्ट
लेन कीपिंग साह्य
-टक्कर रोखण्यासाठी साह्य (पुढील आणि मागील)
-पार्किंग असिस्टन्स सेन्सर (पुढील आणि मागील)
-स्मार्टफोनकरिता वाययरलेस चार्जिंग
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.