VIVO Y19s 5G LAUNCHED IN INDIA saam tv
बिझनेस

Vivo Y19s 5G Launched: Vivo Y19s 5G भारतात लाँच; 6000mAh बॅटरी, ड्युअल कॅमेरा, किंमत मात्र इतकीच...

Budget 5G Phone: Vivo ने भारतात नवीन Y19s 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी, ड्युअल कॅमेरा सेटअप आणि साइड फिंगरप्रिंट स्कॅनर यांसारखी आकर्षक वैशिष्ट्ये दिली आहेत.

Dhanshri Shintre

  • Vivo Y19s 5G भारतात ₹10,999 पासून लाँच झाला आहे.

  • यात 6000mAh बॅटरी आणि 13MP ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

  • फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आणि 90Hz डिस्प्ले आहे.

  • हा स्मार्टफोन Android 15 आधारित FunTouch OS 15 वर चालतो.

Vivo ने भारतात आपला नवीन परवडणारा स्मार्टफोन Vivo Y19s 5G लाँच केला आहे. या हँडसेटमध्ये 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी, ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरने सुसज्ज असून 5G कनेक्टिव्हिटीसह उत्कृष्ट परफॉर्मन्स देण्याचा दावा करण्यात आला आहे.

Vivo Y19s 5G मोबाईलची किंमत

Vivo Y19s 5G तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या बेस मॉडेलची किंमत ₹१०,९९९ असून यात 4GB RAM आणि 64GB स्टोरेज दिले आहे. ४GB + १२८GB मॉडेलची किंमत ₹११,९९९ तर टॉप व्हेरिएंट ६GB + १२८GB ₹१३,४९९ मध्ये उपलब्ध आहे. हा फोन मॅजेस्टिक ग्रीन आणि टायटॅनियम सिल्व्हर या दोन रंगांमध्ये खरेदी करता येईल.

या स्मार्टफोनमध्ये 6.74-इंचाची HD+ LCD डिस्प्ले देण्यात आली आहे, ज्यात 90Hz रिफ्रेश रेट आणि १६०० × ७२० पिक्सेल रिझोल्यूशन आहे. ६nm ऑक्टा-कोर MediaTek Dimensity ६३०० प्रोसेसर आणि ARM Mali-G57 MC2 GPU यामुळे गेमिंग आणि मल्टिटास्किंगसाठी हा फोन अधिक सक्षम ठरतो.

Vivo Y19s 5G रॅम आणि स्टोरेज

रॅम आणि स्टोरेजच्या बाबतीत Vivo Y19s 5G मध्ये 4GB आणि 6GB LPDDR4X रॅमचे पर्याय आहेत. यात अनुक्रमे ६४GB आणि १२८GB स्टोरेज क्षमता दिली आहे आणि २TB पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करते. सॉफ्टवेअरच्या दृष्टीने हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित फनटच OS 15 वर चालतो.

Vivo Y19s 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी या हँडसेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 13MP प्रायमरी सेन्सर (f/2.2 अपर्चर) आणि 0.08MP सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Vivo Y19s 5G बॅटरी

बॅटरी विभागात Vivo Y19s 5G मध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी असून 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. हँडसेटमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे, तसेच टिकाऊपणासाठी मिलिटरी-ग्रेड सुरक्षा मानकांनुसार तयार करण्यात आला आहे. या फोनला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP64 रेटिंग मिळाले आहे, जे त्याला दैनंदिन वापरासाठी अधिक विश्वासार्ह बनवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT