सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज सॅमसंग वॉलेटमध्ये भर केलेल्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांची घोषणा केली. सॅमसंग वॉलेट वैविध्यपूर्ण प्लॅटफॉर्म आहे, जे गॅलेक्सी यूजर्सना एकाच सुरक्षित अॅप्लीकेशनमध्ये डिजिटल कीज, पेमेंट पद्धती, आयडेण्टिफिकेशन कार्डस् व्यवस्थित करण्याची सुविधा देते. ही उल्लेखनीय वैशिष्ट्ये लाखो गॅलेक्सी यूजर्सच्या नवीन डिवाईसेस सेट अप करण्याच्या, पेमेंट्सचे व्यवस्थापन करण्याच्या आणि डिजिटली व्यवहार करण्याच्या पद्धतींमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत.
डिवाईस सेटअपचा भाग म्हणून विनासायास यूपीआय ऑनबोर्डिंग, पिन-फ्री बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन आणि सुधारित टॅप अँड पे सपोर्ट, तसेच फॉरेक्स कार्डस् व ऑनलाइन कार्ड पेमेंट्ससह सॅमसंग वॉलेट तुमच्या डिजिटल जीवनाकरिता वैश्विक व सुरक्षित गेटवे बनण्यासाठी आपल्या मिशनला गती देत आहे.
आम्हाला सॅमसंग वॉलेटमध्ये ही उल्लेखनीय नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये सादर करण्याचा आनंद होत आहे. नवीन अपडेट्ससह सॅमसंग वॉलेट आता फक्त डिजिटल वॉलेट राहिलेले नाही तर डिजिटल पेमेंट्स, प्रवासाच्या आवश्यक गोष्टी, ओळखपत्रे आणि डिजिटल कीसाठी वैश्विक व सुरक्षित गेटवे बनले आहे. यूजर्स त्यांच्या पेमेंट, व्यवहार व प्रवास करण्याच्या पद्धतीनुसार नवीन गॅलेक्सी डिवाईस सेट अप करताच आम्ही अडथळ्यांना दूर करतो आणि सोयीसुविधा वाढवतो, असे सॅमसंग इंडियाच्या सर्विस अँड अॅप्स बिझनेसचे वरिष्ठ संचालक मधुर चतुर्वेदी म्हणाले.
नवीन डिवाईस सेटअपसह बिल्ट-इन यूपीआय ऑनबोर्डिंग - त्वरित अवलंबनाला गती
सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन्सवर नवीन डिवाईस सेटअप अनुभवाचा भाग म्हणून सॅमसंग वॉलेटच्या माध्यमातून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) अकाऊंट्सचे ऑनबोर्डिंग सक्षम करणारी पहिली ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चुरर (ओईएम) आहे. सेटअप प्रवासामध्ये यूपीआय नोंदणी लवकर एकीकृत करत यूजर्स त्यांचे नवीन गॅलेक्सी डिवाईस सुरू करताच पेमेंट करण्यास सुसज्ज असू शकतात. हा विनाव्यत्यय अनुभव गॅलेक्सी डिवाईसेसवर यूपीआयच्या त्वरित व विनासायास अवलंबनाची खात्री देतो. तसेच भारतात डिजिटल पेमेंट्सना अधिक चालना देतो आणि आऊट-ऑफ-बॉक्स ते पेमेंट करण्यापर्यंतचा मार्ग सोपा करतो.
सॅमसंग वॉलेट, यूपीआयसाठी बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन - प्रत्येक वेळी पिन क्रमांकाची गरज नाही
सॅमसंग वॉलेटचा ऑथेन्टिकेशन अनुभव डिवाईस फिंगरप्रिंट व फेशियल रेकग्निशन अशा बायोमेट्रिक सत्यापनाच्या सादरीकरणासह वाढवण्यात आला आहे. ज्यामुळे दररोज वापरासाठी पिन क्रमांक प्रविष्ट करण्याची गरज भासत नाही. यूजर्सना लवकरच अॅप उपलब्ध होईल आणि ते फक्त त्यांच्या गॅलेक्सी डिवाईसच्या फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशनचा वापर करत यूपीआय पेमेंट्स करू शकतील. हे अपग्रेड उपलब्धता सुव्यवस्थित करते, तसेच सुरक्षितता व सोयीसुविधा देखील वाढवते, ज्यामुळे पेमेंट करताना मॅन्युअल इनपुट व फ्रिक्शन कमी होते. या अतिरिक्त ऑथेन्टिकेशन पद्धतीसह सॅमसंग वॉलेट तुमचा फोन अनलॉक करण्याप्रमाणे सुरक्षित पेमेंट सोपे करते.
प्रमुख मर्चंट्सकडे ऑनलाइन क्रेडिट व डेबिट कार्ड पेमेंट्स
सॅमसंग वॉलेट लवकरच प्रमुख मर्चंट्सकडे स्टोअर्ड क्रेडिट व डेबिट कार्डसच्या प्रत्यक्ष ऑनलाइन वापराची सुविधा देईल. यूजर्स त्यांच्या सॅमसंग वॉलेटमध्ये सुरक्षितपणे टोकनाइज केलेल्या क्रेडिट व डेबिट कार्डसचा वापर करत सामान व सर्विसेससाठी ऑनलाइन विनासायासपणे पेमेंट करू शकतील. ज्यासाठी मॅन्युअली कार्ड तपशील भरण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे चेकआऊट अधिक गतीशील व अधिक सुरक्षितपणे होईल.
फॉरेक्स कार्डस् आणि सॅमसंग वॉलेट टॅप अँड पेसाठी नवीन सहयोग
सॅमसंग वॉलेट आधीच आघाडीच्या बँका व कार्ड जारीकर्त्यांच्या क्रेडिट व डेबिट कार्डसना सपोर्ट करण्यासह डिजिटल पेमेंट्स अनुभव सीमांपलीकडे वाढवण्यात आला आहे. जेथे सॅमसंग वॉलेट टॅप अँड पे साठी डब्ल्यूएसएफएक्स ग्लोबल पे लिमिटेडद्वारे समर्थित फॉरेक्स कार्डसना सपोर्ट करेल. ज्यामुळे गॅलेक्सी यूजर्स साध्या टॅपसह विनासायासपणे आंतरराष्ट्रीय व्यवहार करू शकतील. तसेच, सॅमसंगने टॅप अँड पे साठी एयू बँक कार्डसना ऑनबोर्ड केले आहे. ज्यासह बँकिंग सहयोगी आणि समर्थित कार्ड जारीकर्त्यांच्या त्याच्या नेटवर्कचा अधिक विस्तार झाला आहे.
सॅमसंग वॉलेट व उपलब्धता
सॅमसंग वॉलेट वैविध्यपूर्ण प्लॅटफॉर्म आहे, जे गॅलेक्सी यूजर्सना एकाच सुरक्षित अॅप्लीकेशनमध्ये डिजिटल कीज, पेमेंट पद्धती, आयडेण्टिफिकेशन कार्डस् व्यवस्थित करण्याची सुविधा देते. सॅमसंग वॉलेटमध्ये सॅमसंग नॉक्समधील डिफेन्स-ग्रेड सिक्युरिटीद्वारे सुरक्षित विनासायास इंटरफेस आहे. ते गॅलेक्सी परिसंस्थेशी एकीकृत होते, यूजर्सना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये उत्तम कनेक्टीव्हीटी आणि सुरक्षितता देते. नवीन वैशिष्ट्ये लवकरच सहाय्यक गॅलेक्सी डिवाईसेसमध्ये सादर करण्यात येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.