Vivo X200 Series Launched India Today
बिझनेस

Vivo X200 Series: Google Pixel आणि iPhone ला देणार टक्कर; 200 मेगाफिक्सेल कॅमेरा अन् बरेच काही, जाणून घ्या Viv0 X200 सीरिजचे धमाकेदार फीचर्स

Vivo X200 Series Launched: स्मार्टफोन निर्माती कंपनी विवोने भारतात आपली प्रीमियम कॅटेगरीतील फोन सीरिज Vivo X200 लॉन्च केलीय. चला तर जाणून घेऊ या फोनचे फीचर्स आणि किमत काय असेल?

Bharat Jadhav

भारतीय बाजारात स्मार्टफोन आणि मध्यम बजेटचे फोन निर्माण करणारी विवो कंपनीने नवीन धमाकेदार सीरिज लॉन्च केलीय. कंपनीने आपली प्रीमियम स्मार्ट फोन रेंज Vivo X200 Series लाँच केलीय. याची सुरुवात किमत 65,999 ठेवण्यात आलीय. कंपनी या सीरिजद्वारे थेट Google Pixel आणि Apple iPhone सारख्या फोनला टक्कर देणार आहे. जे ग्राहक हे दोन्ही कंपनीचे फोन घेणं पसंत करतात तेही आता या सीरिजच्या प्रेमात पडतील.

₹30,000 पेक्षा कमी किंमत असलेल्या स्मार्टफोन सेगमेंटमध्ये Vivo कंपनीचे फोन भारतीय बाजारपेठेत 16 टक्क्यांहून अधिक आहेत. पण गेल्या काही वर्षात प्रीमियम सेगमेंटमध्ये त्याचे लक्ष वाढले आहे. विवो इंडियाचे प्रमुख कॉरपोरेट स्ट्रॅटजी गीतज चनाना म्हणाले की, कंपनीचं लक्ष्य आता ग्राहक केंद्रित नवकल्पना आणि प्रीमियम विभागाला पुढे नेण्यावर केंद्रित आहे.

Vivo X200 सीरिजच्या फोनची किंमत?

कंपनीने या फ्लॅगशिप सीरीजमधील दोन फोन लॉन्च केलेत. हे Vivo X200 आणि Vivo X200 Pro फोन आहेत. यामध्ये Vivo X200 ची सुरुवातीची किंमत 65,999 रुपये आहे. या किंमतीत तुम्हाला 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल मेमरीचा पर्याय मिळेल. तर 16 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल मेमरी यांच्या कॉम्बिनेशनमध्ये त्याची किंमत 71,999 रुपये असणार आहे.

तर Vivo X200 Pro मध्ये फक्त 16 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल मेमरी या पर्यायात उपलब्ध असणार आहे. त्याची किंमत 94,999 रुपये ठेवण्यात आलीय. कंपनीने ते दोन रंगांमध्ये लॉन्च केले गेले आहे. यात टायटॅनियम ग्रे आणि कॉसमॉस ब्लॅक हे रंग उपलब्ध असणार आहे. या फोनची विक्री 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हा फोन घेण्यासाठी कंपनीने ग्राहकांकरीता 2,750 रुपयांची मासिक EMI योजना देखील आणलीय.

Vivo X200 सीरिजमधील फोनचे खास फीचर्स काय ?

या फोनचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे त्याचा 200 मेगापिक्सेल कॅमेरा. कंपनीने Vivo X200 Pro मध्ये 200 मेगापिक्सलचा सॅमसंग कॅमेरा देण्यात आलाय. तर स्टँडर्ड व्हर्जनमध्ये 50 मेगापिक्सेलचा सोनी कॅमेरा देण्यात आलाय. पुढील बाजूस दोन्ही फोनमध्ये 50 मेगापिक्सेल सॅमसंगचा कॅमेरा देण्यात आलाय. दोन्ही फोनचा मुख्य कॅमेरा सोनी कंपनीचा असून तो 50 मेगापिक्सेलचा आहे. हे टेलीफोटो कॅमेरे आहेत.

हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित Funtouch ऑपरेटिंग सिस्टम 15 वर काम करतो. Vivo X200 मध्ये 6.67 इंचाची स्क्रीन मिळेल. तर Vivo X200 Proमध्ये स्क्रीनचं साइज 6.78 इंच असेल. दोन्ही फोनमध्ये Octa-Core Dimensity 9400 3nm प्रोसेसर आणि Immortalis-G925 GPU आहे. Vivo X200 मध्ये 5800mAh बॅटरी आहे आणि Vivo X200 Pro मध्ये 6000mAh बॅटरी आहे. दोन्ही फोनमध्ये 90W वायर्ड फ्लॅश चार्जिंग असणार आहे. तर Vivo X200 Pro मध्ये 30W वायरलेस फ्लॅश चार्जिंग असणार आहे.

Google Pixel आणि Apple iPhone शी स्पर्धा

किंमत श्रेणीनुसार, Vivo X200 सीरिज एक प्रीमियम सेगमेंट फोन आहे. Google Pixel आणि Apple iPhone च्या जनरेशनचे जुने फोन या किमतीत आधीच उपलब्ध आहेत. अशाप्रकारे तुम्हाला Google Pixel 8 Rs 65,999 पेक्षा कमी किंमतीत मिळेल. तर iPhone 15 ची रेंज देखील Rs 64,900 पासून सुरू होते. अशा परिस्थितीत या सेगमेंटमध्ये Apple, Samsung, Google Pixel आणि काही प्रमाणात OnePlus च्या ब्रँड व्हॅल्यूला सामोरे जाण्याचे सर्वात मोठे आव्हान विवोसाठी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Salman Khan : रक्तबंबाळ शरीर अन् डोळ्यात आग; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चं पोस्टर रिलीज, पाहा VIDEO

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT