Vivo लवकरच भारतात Vivo V60 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे.
यात प्रीमियम डिझाइन आणि हाय-क्वालिटी सेल्फी कॅमेरा असेल.
5G कनेक्टिव्हिटी, AMOLED डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग फीचर्स उपलब्ध असतील.
किंमत प्रीमियम सेगमेंटमध्ये असण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडे काही दिवस प्रतिक्षा करा. कारण लवकरच एक नवीन स्मार्टफोन बाजारात येणार आहे. येत्या काही दिवसांत विवो कंपनी मोठी धमाका करणार आहे. विवो कंपनी आपल्या कोट्यवधी भारतीय चाहत्यांसाठी Vivo V60 फोन लॉन्च करणार आहे. (Vivo V60 5G launch date in India, price and full specifications)
कंपनी हा स्मार्टफोन १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता लाँन्च करणार आहे. पण लाँन्च होण्यापूर्वीच बाजारात त्याची किंमत काय असेल हे समोर आले आहे. चला तुम्हाला या स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती देऊया. Vivo V60 मध्ये चाहत्यांना दमदार फीचर्स मिळणार आहेत. जर तुम्हाला असा स्मार्टफोन हवा असेल ज्यामध्ये दमदार फीचर्स तसेच उत्तम डिझाइन असेल तर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.
पण वाचक मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या Vivo कंपनी हा आगामी स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विकणार आहे. यासाठी ई-कॉमर्स वेबसाइटवर एक मायक्रोसाईट देखील लाईव्ह करण्यात आलीय. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला IP68 + IP68 रेटिंगसह 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. एका युझरने Vivo V60 5G च्या किंमतीबद्दल मोठा खुलासा केलाय.
बाजारात येण्यापूर्वीच त्याची किंमत काय असणार याची माहिती झालीय. युझरच्या दाव्यानुसार, Vivo V60 5G सुमारे 40,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये लाँन्च होईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या किंमतीबाबत माहिती दिलीय. हा Vivo स्मार्टफोन बाजारात Samsung आणि Google च्या प्रीमियम स्मार्टफोनशी थेट स्पर्धा करेल.
दरम्यान या कंपनीने भारतीय बाजारात Vivo V50 5G फक्त 34,999 रुपयांच्या किमतीत लाँन्च केला होता. यामध्ये कंपनीने 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिले होते. तर 12 जी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज असलेले त्याचे मॉडेल 40,999 रुपयांना लाँन्च करण्यात आले. यावरून असा अंदाज लावता येतो की, Vivo V60 5G च्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे ४५ हजार रुपये असू शकते.
Vivo V60 5G मध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी प्लस डिस्प्ले असू शकतो, ज्यामध्ये AMOLED पॅनेल असेल. डिस्प्ले पंच होल डिझाइनसह येईल जो एक वक्र डिस्प्ले असेल. याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. या स्मार्टफोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज पर्याय उपलब्ध असू शकतो. Vivo V60 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 ऑक्टा-कोर प्रोसेसर असू शकतो.
फोटोग्राफीसाठी, मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यामध्ये ५० + ५० + ५० मेगापिक्सेल सेन्सर असू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात ५० मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी, यात ६५००mAh ची मोठी बॅटरी असेल जी ९०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.
Vivo V60 भारतात कधी लाँन्च होणार आहे?
कंपनीने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु लवकरच भारतात Vivo V60 5G लाँन्च होणार आहे.
Vivo V60 चे मुख्य फीचर्स कोणते आहेत?
प्रीमियम डिझाइन, हाय-रेझोल्यूशन सेल्फी कॅमेरा, 5G कनेक्टिव्हिटी, AMOLED डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग ही या फोनची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
Vivo V60 कोणत्या कॅटेगरीत मोडतो?
हा एक फ्लॅगशिप कॅटेगरीचा स्मार्टफोन आहे.
याची किंमत किती असण्याची शक्यता आहे?
किंमत अधिकृतरीत्या जाहीर केलेली नसली तरी प्रीमियम सेगमेंटमध्ये असण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.