Vande Bharat Sleeper Coach Saam Tv
बिझनेस

Vande Bharat Sleeper Coach : वंदे भारतच्या स्लीपर कोचचा फर्स्ट लूक; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले फोटो शेअर

Vande Bharat Sleeper Coach First Look : वंदे भारत ट्रेनमध्ये रंग,रुपानंतर लवकरच स्लीपर कोच सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Railway Minister Ashwini Vaishnaw Shared Vande Bharat Sleeper Coach First Look :

वंदे भारत' ही भारतातील सुपरफास्ट रेल्वे आहे. ही रेल्वे सर्वात जास्त वेगाने धावते. या रेल्वेमध्ये मागील काही दिवसांत अनेक बदल करण्यात आले होते. रंग, रुपानंतर लवकरच स्लीपर कोच सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. आता या स्लीपर कोचचे काम चालू असून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कनसेप्ट फोटो शेअर केले आहेत.

वंदे भारत स्लीपर कोचचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्लीपर कोच हा नवीन इंटेरियसह अत्यंत अलिशान दिसत आहे. यात अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. हा नवीन स्लीपर कोच कोणत्याही अलिशान हॉटेलपेक्षा कमी दिसत नाही. या स्लीपर कोचची तुलना बिझनेस क्लासशी केली तर काही चुकीचे ठरणार नाही.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत रेल्वेच्या स्लीपर कोचची कनसेप्ट असलेले फोटो शेअर केले आहे. ही ट्रेन २०२४ मध्ये येईल. अशी माहितीदेखील त्यांनी दिली आहे.

स्लीपर कोच

वंदे भारतच्या स्लीपर कोचमध्ये अनेक नवीन सुविधा असणार आहोत. यात अत्यंत सुंदर इंटेरिअर, मोठी जागा यासह अनेक सुरक्षांचा समावेश आहे. या नवीन कोचमुळे रेल्वेत ऊर्जेची बचत होणार आहे. ही ट्रेन पर्यावरणपूरक असणार आहे. सध्या या ट्रेनचे डबे 'चेअर कार' आहेत. यामध्ये आता नवीन स्लीपर कोचचा समावेश होत आहे. नवीन स्लीपर कोच भारतीय रेल्वे ताफ्यातील महत्त्वाची ट्रेन असणार आहे. या ट्रेनमुळे रात्रभर लांब पल्ल्याचा प्रवास होणे सोपे होणार आहे.

वंदे भारतच्या स्लीपर कोचनंतर आता वंदे मेट्रोदेखील लवकरच उपलब्ध होणार आहे. ही मेट्रो कमी अंतरासाठी वापरली जाणार आहे. ही मेट्रोदेखील जानेवारी २०२४ पर्यंत सुरू होईल.अशी माहिती देण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT