US President Donald Trump announces 100% tariff on Chinese imports; global investors, including India, brace for economic impact. saam tv
बिझनेस

Explainer: गुंतवणूकदारांची वाढली धकधक; चीनवर 100 टक्के टॅरिफ, अमेरिकेच्या निर्णयानं भारतावर काय होणार परिणाम?

US-China Trade War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व चिनी आयातीवर १००% कर लादलाय. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार युद्ध आणखी वाढले आहे. चीनने दुर्मिळ धातूंच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Bharat Jadhav

  • डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधील सर्व आयातीवर १०० टक्के टॅरिफ लावले आहे.

  • भारतीय बाजारपेठेत गुंतवणूकदारांची अनिश्चितता वाढू शकते.

  • जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगात व्यापर युद्ध भडकवलंय. भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चीनवर थेट १०० टक्के टॅरिफ लावलाय. अमेरिका चीनमधून येणाऱ्या सर्व आयातीवर १०० टक्के अतिरिक्त कर लावेल. चीनने दुर्मिळ धातूंच्या निर्यातीवर निर्बंध लावली आहेत, त्याचमुळे टॅरिफचा निर्णय घेण्यात आलाय, असं ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा करताना सांगितलं.

हे नवीन शुल्क आणि महत्त्वाच्या सॉफ्टवेअरवरील अमेरिकेचे निर्यात नियंत्रण १ नोव्हेंबरपासून लागू होतील, असे ट्रम्प म्हणालेत. चीनवर टॅरिफ लावण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर जागतिक शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आले. NASDAQ 3.6% आणि S&P 500 2.7% घसरला. एप्रिलनंतर वॉल स्ट्रीटसाठी हा सर्वात वाईट दिवस होता.

चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर आधी ३०% अमेरिकन कर आकारला जातो, तर बीजिंग अमेरिकन उत्पादनांवर १०% कर लादतो. दरम्यान १०० टक्के शुल्क आकरल्यानंतर दोन्ही देशातील बराचसा व्यापार बंद होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याच्या निर्णयाचा भारतीय व्यापारावर काय परिणाम होईल, एक्सपर्ट काय म्हणातात ते जाणून घेऊ.

चीनवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय बाजारात घसरण होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी जेव्हा अमेरिकेनं निर्णय घेतला होता. त्यावेळी निफ्टी ०.७८ टक्क्यांनी घसरून २५,२०५ वर व्यवहार करत होता. तो संभाव्य गॅप-डाउन ओपनिंग होईल असं म्हटलं जात आहे. गेल्या आठवड्यात चांगल्या कामगिरीनंतरही डाऊन ओपनिंग दर्शवत होता. दरम्यान मागील आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही सुमारे १.५ टक्क्यांनी वाढले होते.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार एनरिच मनीचे सीईओ आणि सेबी रजिस्टर्ड एक्सपर्ट पोनमुडी आर यांनी सांगितलं की, पुढील आठवड्यात बाजाराची दिशा देशातील उद्योजक, जागतिक व्यापार, आर्थिक स्थिती आणि कॉर्पोर्ट कमाईच्या संयोजनावर अवलंबून असणार आहे. अमेरिका-चीनच्या टॅरिफ युद्ध पुन्हा वाढल्यानं जागितक धोके वाढतील त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हा निर्णय डॉलरच्या असित्त्वावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात नव्याने येणारे शेअर्स आणि मुद्रेवरती अजून दबाव वाढेल. कॉर्पोरेटमधील आघाडीवर असलेल्या आयटी क्षेत्रावर , सर्वांचे लक्ष असेल. यातील इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा सारख्या प्रमुख कंपन्या त्यांचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. दरम्यान भारत इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संरक्षण उद्योगासाठी दुर्मिळ पृथ्वीवर आधारित घटकांची आयात करतो. अमेरिका-चीनमधील दीर्घकाळ चालणाऱ्या तणावामुळे याच्या किमती वाढू शकतात आणि पुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट, युती होणार का? बाळा नांदगावकरांनी मोजक्या शब्दात सांगितलं

Pakistan Afghanistan War: पाक-अफगाणिस्तानमध्ये युद्ध पेटलं, पाकचे 58 सैनिक ठार,

Afghanistan Attack : वाद पेटला! अफगाणिस्तानवर मोठा हल्ला, २०० तालिबानी तरुणांचा मृत्यू

Jalgaon News: वाळूमाफियांची मुजोरी! तलाठ्यावर प्राणघातक हल्ला,ट्रॅक्टरवरून खेचत चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न

Maharashtra Politics: राज ठाकरे तिसऱ्यांदा मातोश्रीवर, युतीच्या मुहूर्तासाठी डिनर डिप्लोमसी?

SCROLL FOR NEXT