UPI Saam Tv
बिझनेस

UPI वरून चुकीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले? ही प्रोसेस फॉलो करा अन् लगेच मिळवा पैसे

UPI Payment Rules: यूपीआय पेमेंट करताना चुकीच्या अकाउंटला पैसे गेले असतील तर हे का लगेच करा. जेणेकरुन तुम्हाला पैसे मिळू शकतात. त्यासाठी ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस लगेच फॉलो करा.

Siddhi Hande

UPI पेमेंट करताना चुकून दुसऱ्याच व्यक्तीला पैसे ट्रान्सफर झाले?

चुकीच्या अकाउंटला पैसे गेल्यावर काय करावे?

ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस लगेच करा

सध्याच्या काळात रोज असंख्य लोक यूपीआयचा वापर करतात. अवघ्या काही सेकंदात तुम्ही पैसे ट्रान्सफर करु शकतात. यूपीआयचा वापर दिवसेंदिवस वाढत आहेत. भाजीवाल्यापासून ते इन्व्हेस्टमेंट करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी यूपीआय पेमेंटचा वापर करतात. दरम्यान, यूपीआय पेमेंट करताना विशेष काळजी घ्यायची असते. तुम्ही यूपीआय पेमेंट ओळखीच्या व्यक्तीला करत आहात की नाही याची खात्री करा.

अनेकदा यूपीआय पेमेंट करताना तुम्ही चुकीच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करतात. यामुळे तुमचे पैसे वेगळ्याच व्यक्तीच्या खात्यात जमा होतील. दरम्यान, अशा परिस्थितीत काय करावे, हे अनेकांना माहित नसतं. तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता.

या गोष्टी करा (How to Recover Money Transferred to Wrong UPI Address?)

तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठवले आहेत त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा. त्या व्यक्तीशी संपर्क झाल्यावर त्याला घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती द्या. माझ्याकडून चुकून तुम्हाला पैसे ट्रान्सफर झाले आहे, असं सांगा. अनेकदा लोक इमानदारीत तुमचे पैसे परत करतात.

बँकेशी संपर्क करा (Wrong UPI transaction refund)

जर समोरच्या व्यक्तीने पैसे द्यायला नकार दिला तर तुम्ही बँकेशी संपर्क करु शकतात. तुम्ही यूपीआय अॅपवरुन Report Issue किंवा Raise Complaint हा ऑप्शन निवडू शकतात. यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल. तुम्ही BHIM अॅप किंवा NPCI च्या वेबसाइटवर जाऊनदेखील तक्रार करु शकता.

जर बँकेकडून तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळाले नाही तर अधिकाऱ्यांकडे तक्रार करु शकतात. प्रत्येक बँकेत तक्रार निवारण कक्ष असतो. ते तुम्हाला मदत करतात. या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागेल परंतु ही प्रक्रिया करु शकतात.

जर तुमचे बँकेकडूनदेखील काम झाले नाही तर तुम्ही RBI च्या Complaint Management Systemद्वारे तक्रार करु शकतात.याअंतर्गत Integrated Ombudsman Scheme मध्ये तुमच्या तक्रारीची नोंद करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coal Block Case : माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांविरोधात सुप्रीम कोर्टात सुरू होता खटला, आता क्लीन चिट; नेमकं प्रकरण काय?

Sonu Sood On Kangana Ranaut: 'जनता देव असते, बोलण्याआधी विचार करा'; कंगना रणौतच्या Gen Z वक्तव्यावर सोनू सूदचा टोला

Maharashtra News Live Update: नालासोपारा येथील रिसॉर्टमध्ये दारूच्या पार्टीदरम्यान हवेत गोळीबार

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

SCROLL FOR NEXT