UPI charges for users and small merchants Saam TV Marathi
बिझनेस

UPI पेमेंटवर खरोखरच चार्ज लागणार का? अखेर सत्य समोर आलं, सर्वांनाच मिळाला दिलासा

UPI Charges: UPI पेमेंटवर चार्ज लागणार असल्याच्या चर्चांदरम्यान पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. सामान्य ग्राहक आणि लहान व्यापाऱ्यांसाठी UPI व्यवहार मोफत राहण्याची माहिती देण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

UPI charges for users and small merchants : UPI वर आता शुल्क लागू होणार, अशा चर्चांमुळे देशभरातील कोट्यवधी युजर्समध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं. मात्र, Payment Council of India (PCI) ने या सर्व चर्चांवर पूर्णविराम देत अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासादायक स्पष्टीकरण दिले आहे. PCI ने स्पष्ट केले आहे की, सामान्य ग्राहक (Users) आणि लहान दुकानदारांसाठी (Small Merchants) UPI द्वारे होणारे सर्व व्यवहार आधीसारखेच पूर्णपणे मोफत राहतील. युजर्सकडून किंवा किराणा दुकानदारांकडून कोणत्याही प्रकारचा 'मर्चंट डिस्काउंट रेट' (MDR) किंवा अतिरिक्त चार्ज आकारला जाणार नाही.

युपीआय हे जगातील सर्वात मोठे डिजिटल पेमेंट नेटवर्क बनल्यामुळे त्याची तांत्रिक सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि पायाभूत सुविधा मजबूत ठेवण्यासाठी मोठा खर्च येतो. भविष्यात जर मोठा व्यवसाय करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्या किंवा मोठ्या मर्चंट्सवर शुल्क लागू झाले, तरी त्याचा सामान्य युजर्सवर ५ पैशांचाही परिणाम होणार नाही, असे PCI कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शुक्रवारी 'पेमेंट कौन्सिल ऑफ इंडिया' (PCI) ने 'X' (ट्विटर) वर माहिती देत स्पष्ट केले की, २०१६ मध्ये UPI सुरू झाल्यापासून ग्राहकांसाठी हे पेमेंट पूर्णपणे मोफत आहे आणि पुढेही मोफतच राहील. लहान व्यावसायिक आणि किराणा दुकानदारांकडून UPI पेमेंट स्वीकारण्यासाठी कोणताही 'MDR' (मर्चंट डिस्काउंट रेट) किंवा अतिरिक्त चार्ज घेतला जाणार नाही. लहान व्यापाऱ्यांना डिजिटल व्यवहारांची सोय व्हावी, यासाठीच UPI बनवले गेले आहे.

UPI आता जगभरातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट सिस्टीम बनली आहे. दरमहा अब्जावधी व्यवहार होत असल्याने ही सिस्टीम सुरक्षित आणि वेगात चालवण्यासाठी तांत्रिक सुधारणा आणि खर्चाबाबत चर्चा सुरू आहे. भविष्यात सिस्टीम सुधारण्यासाठी काहीही निर्णय झाले, तरी त्याचा सामान्य ग्राहक आणि लहान व्यापाऱ्यांच्या खिशावर १ रुपयाचाही अतिरिक्त भार पडणार नाही.

PCI ने स्पष्ट केले आहे की, डिजिटल पेमेंटची सिस्टीम सुरक्षित आणि २४ तास सुरू ठेवण्यासाठी तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि ग्राहक सेवेवर मोठा खर्च होतो. सध्या हा सर्व खर्च बँका आणि पेमेंट कंपन्या स्वतः उचलत आहेत, ज्यामुळे आपण (ग्राहक) मोफत पेमेंट वापरू शकत आहोत. भविष्यात जर मोठ्या कंपन्या किंवा मोठ्या व्यापाऱ्यांकडून (Big Merchants) पेमेंट स्वीकारण्यासाठी सेवा शुल्क (Service Charge) घेतले गेले, तरी सामान्य ग्राहकांकडून एक रुपयाही घेतला जाणार नाही. हे शुल्क म्हणजे केवळ मोठे व्यापारी आणि पेमेंट कंपन्यांमधील व्यावसायिक व्यवहार (Deal) असेल. जगभरात अनेक देशांमध्ये हीच पद्धत वापरली जाते, जिथे मोठ्या व्यापाऱ्यांकडून शुल्क घेतले जाते, पण सर्वसामान्य नागरिकांसाठी डिजिटल पेमेंट सेवा मोफतच राहते.

UPI वर (मोठ्या व्यापाऱ्यांसाठी) शुल्क विचारधीन असण्यामागे PCI ने सुरक्षा आणि सिस्टीमचा दर्जा ही मुख्य कारणे दिली आहेत. आज UPI हे भारताच्या आर्थिक व्यवहारांचा कणा बनले आहे. कोट्यवधी लोक रोज UPI वापरतात, त्यामुळे सिस्टीमवर प्रचंड ताण येतो. डिजिटल फ्रॉड (फसवणूक) रोखणे, सायबर सुरक्षा मजबूत करणे आणि पेमेंट पटकन (फास्ट) होण्यासाठी तंत्रज्ञानावर सतत मोठा खर्च करावा लागतो. गेल्या १० वर्षांपासून बँका, फिनटेक कंपन्या, NPCI आणि RBI सतत कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. म्हणूनच आज UPI दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे ७ दिवस विनाअडथळा आणि सुरक्षितपणे चालते. हा उच्च दर्जा आणि सुरक्षा भविष्यातही अशीच टिकवून ठेवण्यासाठी या सिस्टीममध्ये सतत नवनवीन गुंतवणूक करणे आवश्यक आहे, असे PCI चे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लाडक्या बहिणींचे १५०० ऐवजी ३ हजार रुपये करा, रक्षाबंधनानिमित्त आमदार रवी राणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

School Admission Age: मुलांना शाळेत कधी पाठवावं? योग्य वय ठरवताना लक्षात ठेवा ७ महत्त्वाच्या गोष्टी

Mumbai : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! सातही तलावांत ९५.८७ टक्के पाणीसाठा; कोणत्या तलावात किती पाणी? जाणून घ्या

Accident : राजगडच्या पुलावर चालकाचा ताबा सुटला, स्लीपर बसचा भयंकर अपघात; ४ जणांचा मृत्यू, १२ गंभीर जखमी

Shocking : धक्कादायक! भाजप नेत्याच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, अंतर्वस्त्रात आढळली चिठ्ठी; समोर आले कारण

SCROLL FOR NEXT