UPI Payment Tax Saam Tv
बिझनेस

UPI Payment Tax: ४० पैसे भरल्याने तुम्ही मरणार नाही; UPI टॅक्सवर नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचं मोठं वक्तव्य

UPI Payment Tax: २,००० रुपयांपेक्षा जास्त व्यापारी UPI पेमेंटवर ०.४ टक्के MDR लागू होणार आहे. अशोक लाहिरींनी शुल्काचे समर्थन केले असून, ४० पैसे भरल्याने तुम्ही मरणार नाही असे वक्तव्य केले आहे.

Shruti Vilas Kadam

UPI Payment Tax: UPI पेमेंटवर टॅक्स लावण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. १५ ऑक्टोबर २०२६ पासून २,००० रुपये पेक्षा जास्त रकमेच्या काही व्यापारी UPI पेमेंटवर ०.४ टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू होणार आहे. या निर्णयावर व्यापारी आणि विविध घटकांकडून चिंता व्यक्त होत असताना, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांनी या टॅक्सला समर्थन केले आहे. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, हे त्यांचे वैयक्तिक मत असून नीती आयोगाचे हे अधिकृत मत नाही.

लाहिरी यांनी डिजिटल पेमेंट व्यवस्था कायम सरकारी अनुदानावर चालू शकत नाही, असे मत व्यक्त केले. त्यांच्या मते, कोणत्याही सेवेसाठी काही ना काही खर्च असतो आणि डिजिटल पेमेंटची यंत्रणाही आर्थिकदृष्ट्या टिकाऊ असणे गरजेचे आहे. त्यांनी १०० च्या व्यवहारासाठी ४० पैसे शुल्काचे उदाहरण देत हा खर्च तुलनेने कमी असल्याचे सांगितले.

चाणक्या नितीचे उदाहरण

आपली भूमिका स्पष्ट करताना लाहिरी यांनी चाणक्यांच्या तत्त्वांचा दाखला देत ते म्हणाले, राजाने प्रजेकडून कर अशा पद्धतीने घ्यावा, जसा मधमाशी फुलाला इजा न करता त्यातील मध गोळा करते. त्यांनी १०० च्या व्यवहारासाठी ४० पैसे शुल्काचे उदाहरण सांगितले, १०० रुपयांच्या व्यवहारावर तुम्हाला केवळ ४० पैसे मोजावे लागतात आणि तेही केवळ मोठ्या व्यवहारांवर. त्यामुळे ४० पैसे भरल्याने तुम्ही मरणार आहात का? अजिबात नाही. ही यंत्रणा चालवण्याचा खर्च तुम्हाला करावाच लागेल आणि हळूहळू तुम्हाला याची सवय होईल.

UPI वर नेमके किती शुल्क?

केंद्र सरकारच्या नियमांनुसार २,००० रुपये पेक्षा जास्त किंमतीच्या Person-to-Merchant (P2M) UPI पेमेंटवर ०.४ टक्के MDR लागू होईल. ७५,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेमेंटसाठी हे शुल्क प्रति व्यवहार कमाल ३०० रुपये असेल. मात्र, व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला केलेले P2P UPI पेमेंट केल्यास कोणतेही टॅक्स लागू होणार नाही. रेल्वे, दूरसंचार, विमा, इंधन आणि कृषी निविष्ठा यांसारख्या काही क्षेत्रांमध्ये २,००० रुपये पेक्षा जास्त व्यवहारांवर ५ रुपयांचे निश्चित MDR लागू होईल. तसेच छोट्या व्यापाऱ्यांना काही अटींनुसार शून्य MDRचा लाभ मिळत राहणार आहे.

सरकारने मात्र स्पष्ट केले आहे की MDR हा ग्राहकांकडून थेट आकारला जाणारा UPI टॅक्स नसून व्यापारी पेमेंट इकोसिस्टममधील टॅक्स आहे. त्यामुळे नव्या नियमांनंतर UPIच्या वापराबाबतची चर्चा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'काव काव केल्याने कोणी कोयल होत नाही'; ठोंबरेंना सारंग यांचं प्रत्युत्तर, जागावाटपावरून राष्ट्रवादीत वाद चिघळला

काँग्रेस उद्या देशभरात 'काळा दिवस' पाळणार, इंडिया आघाडीचं दिल्लीत उद्या पुन्हा आंदोलन?

सकाळ करंडक : आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत तरुणाईचा नाट्याविष्कार, स्पर्धेचे वेळापत्रक वाचा

भाजपनं ८० च्या दशकातील अभिनेत्याला दिली महत्त्वाची जबाबदारी; सुपरस्टारला मिळाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा

वय वाढलं की राजकारणी वेड्यासारखं करतात; इंदुरीकर महाराजांच्या विधानानं वाद

SCROLL FOR NEXT