5 Healthy Drink For Women: 30 वर्षावरील महिलांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, आरोग्य राहील ठणठणीत

Manasvi Choudhary

तिशी ओलांडल्यानंतर आरोग्याची घ्या काळजी

बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल तिशी ओलांडल्यानंतरच शरीराचं दुखणं सुरू होतं. महिलांमध्ये या समस्या अधिक दिसतात.

5 Healthy Drink For Women

शारीरिक समस्या

अशक्तपणा, हाडे दुकणे, वजन वाढणे आणि त्वचेवरील तेज कमी होणे यांसारख्या समस्या महिलांना उद्भवतात.

5 Healthy Drink For Women

5 हेल्दी ड्रिंक्स

यासाठी वयाची 30 शी ओलांडल्यानंतर तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष दिले पाहिजे. काही हेल्दी ड्रिंक्सचा आहारात समावेश केला पाहिजे.

5 Healthy Drink For Women | pintrest

कोमट पाण्यात तूप मिक्स करून पिणे

सकाळी रिकाम्या पोटी एक थेंब शुद्ध तूप कोमट पाण्यातून घेतल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते, पोट साफ होण्यास मदत होते आणि शरीराला नैसर्गिक स्निग्धता मिळते.

5 Healthy Drink For Women

काळी मिरीचे पाणी

पाण्यात काळी मिरी पावडर उकळून किंवा मिक्स करून प्यायल्याने शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते. तसेच यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचा तरूण आणि टवटवीत ठेवतात.

Black Pepper Water

बडीशेप, पुदीना आणि वेलचीचे पाणी

जेवणानंतर अर्ध्या तासाने बडीशेप, पुदीना किंवा वेलची घालून उकळलेले पाणी किंवा त्याचे अर्क प्यायल्याने खाल्लेले अन्न लवकर पचते. यामुळे अपचन, गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास कधीही होत नाही

Saunf Mint And Elachi Water

दालचिनीचे पाणी

दालचिनीचे पाणी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. हे पेय प्यायल्याने अनावश्यक भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Cinnamon Water

हळद आणि काळी मिरी घातलेले कोमट दूध

रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास कोमट दुधात चिमूटभर हळद आणि काळी मिरी पावडर घालून प्यायल्याने गाढ आणि शांत झोप लागते. तसेच यामुळे सांधेदुखी कमी होऊन हाडे मजबूत होतात.

Turmeric And Black Paper milk | saam

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: 7 Best Hair Oil For Hair Growth: लांब आणि दाट केसांसाठी फक्त नारळ तेलच नाही तर हे 7 तेल देखील ठरतील बेस्ट

7 Best Hair Oil For Hair Growth
येथे क्लिक करा...