पैसे काढण्यासाठी यापुढे तुम्हाला एटीएम शोधण्याची गरज भासणार नाहीये. कारण लवकरच मोबाइलवरच क्यूआर कोड स्कॅन करून तुम्हाला घरीत कॅश मिळणार आहे.. स्मार्टफोनद्वारे ही रोख रक्कम काढणे आता सोपे होणारये... नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याची तयारी केलीये... लवकरच देशभरातील 20 लाखांहून अधिक बिझनेस करस्पॉंडंट आउटलेट्सवर युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे म्हणजेच UPI द्वारे 10 हजारापर्यंतची रक्कम काढता येणार आहेत... यासाठी NPCI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे मंजुरी मागितलीये... भारतामधील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक फायदा होईल...
आता घरबसल्या मिळणार कॅश?
पैसे काढण्यासाठी आता ATMमध्ये जाण्याची गरज नाही
स्मार्टफोनद्वारे रोख रक्कम काढण्याची सुविधा मिळणार
किराणा दुकानदार किंवा छोट्या व्यावसायिकांकडे सुविधा
QR कोडच्या माध्यमातून ग्राहकांना रोख रक्कम काढता येणार
लहान केंद्रांना, दुकानदारांना यासाठी QR कोड दिले जाणार
सध्या UPIद्वारे रोख रक्कम काढणे काही निवडक एटीएम आणि दुकानांमध्ये आहे. शहरांमध्ये प्रत्येक व्यवहारावर फक्त 1 हजार रुपयापर्यंतची रोख रक्कम काढता येते. ग्रामीण भागात ही मर्यादा 2 हजारांपर्यंत आहे. मात्र आरबीआयने लवकरच परवानगी दिली तर ग्राहकांना घरबसल्या मोठी कॅश काढता येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.