Tata Curvv 2024 Vs Citroen Basalt SUV  Saam Tv
बिझनेस

Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

Upcoming SUV: या वर्षी भारतात अनेक नवीन वाहने लाँचसाठी सज्ज आहेत. पुढील 2-3 महिन्यांत तुम्हाला अनेक नवीन मॉडेल्स दिसतील. एका रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स आणि सिट्रोएन त्यांच्या नवीन SUV लॉन्च करणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Upcoming SUV:

या वर्षी भारतात अनेक नवीन वाहने लाँचसाठी सज्ज आहेत. पुढील 2-3 महिन्यांत तुम्हाला अनेक नवीन मॉडेल्स दिसतील. एका रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स आणि सिट्रोएन त्यांच्या नवीन SUV लॉन्च करणार आहेत. जर तुम्ही नवीन SUV घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण आम्ही तुम्हाला काही अपकमिंग एसयूव्हीबद्दल सांगणार आहोत.

Tata Curvv

टाटा मोटर्स या वर्षी ऑगस्टमध्ये आपली नवीन Curvv लॉन्च करणार आहे. ही एक इलेक्ट्रिक कूप असेल जी मोठ्या बॅटरीसह येईल. ही कार पूर्ण चार्ज केल्यावर 500 किलोमीटरची रेंज देऊ शकते, असं बोललं जात आहे.

भारतात याची स्पर्धा मारुती सुझुकी eVX आणि Hyundai Creta EV शी होईल. Curvv ही भारतातील पहिली परवडणारी SUV असेल. अलीकडेच टाटाने नवीन Curvv सादर केली आणि त्याच्या डिझाइनने सर्वांना आकर्षित केले. त्यात अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.

Citroen Basalt

Citroen ची नवीन Basalt SUV देखील याच वर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च होणार आहे. अलीकडेच कंपनीने या नवीन मॉडेलच्या डिझाइनचे अनावरण केले. या नवीन मॉडेलची खरी स्पर्धा टाटा मोटर्सच्या आगामी Curvv शी असेल.

नवीन Basalt सीएमपी प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. यामध्ये कंपनीची सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Citroen C3 Aircross सारखेच फीचर्स मिळू शकतात. भारतात या नवीन मॉडेलची विक्री येत्या काही महिन्यांत सुरू होऊ शकते. नवीन Basalt मध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT