Vivo T3X 5G Phone Feature and Price Detail in Marathi Saam Tv
बिझनेस

Vivo T3X 5G Launch: प्रतीक्षा संपली! पॉवरफुल कॅमेरासह 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येत आहे जबरदस्त स्मार्टफोन

Vivo T3X 5G Phone Feature and Price Detail in Marathi: चीनी मोबाईल उत्पादक कंपनी Vivo भारतीय बाजारात नवीन बजेट स्मार्टफोन Vivo T3X 5G लॉन्च करणार आहे. आता या फोनच्या लॉन्चिंगची डेडही निश्चित झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Vivo T3X 5G Phone Specification and Price:

चीनी मोबाईल उत्पादक कंपनी Vivo भारतीय बाजारात नवीन बजेट स्मार्टफोन Vivo T3X 5G लॉन्च करणार आहे. आता या फोनच्या लॉन्चिंगची डेडही निश्चित झाली आहे. कंपनी Vivo T2X 5G चा अपडेटेड व्हर्जन म्हणून हा फोन लॉन्च करणार आहे, जो T-सीरीजचा आधीचा डिव्हाइस आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रीमियम डिझाइनसह पॉवरफुल कॅमेरा असेल आणि याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

कंपनीने जारी केलेल्या या फोनच्या टीझरनुसार, यात Vivo T3X 5G मध्ये Qualcomm Snapdragon प्रोसेसर असेल आणि याचा AnTuTu स्कोर 5.6 लाख झाला आहे. एका रिपोर्टनुसार, हा फोन स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 प्रोसेसरसह येऊ शकते. याशिवाय डिवाइसचे बाकीचे स्पेसिफिकेशन्स देखील येत्या काही दिवसात समोर येतील. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढील आठवड्यात होणार लॉन्च

Vivo T3X 5G 17 एप्रिल रोजी भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे. हा फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केले जाईल आणि कंपनीच्या वेबसाइटशिवाय, ग्राहक हा फोन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर देखील खरेदी करू शकतील. नवीन फोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटमध्ये येणार. यावर ग्राहकांना विशेष ऑफरचा लाभ देखील मिळू शकतो. (Latest Marathi News)

Vivo T3X 5G मध्ये मिळू शकतात हे फीचर्स

मिळालेल्या माहितीनुसार, Vivo च्या नवीन स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह मोठा 6.72-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. अँड्रॉइड 14 वर आधारित सॉफ्टवेअरशिवाय या फोनमध्ये IP64 रेटिंग देण्यात येणार आहे. साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर व्यतिरिक्त, Vivo T3X 5G 8GB पर्यंत रॅम मिळू शकतो.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP प्रायमरी व्यतिरिक्त Vivo T3X 5G च्या मागील पॅनेलवर 2MP सेन्सर मिळू शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. यात मोठी 6000mAh बॅटरी दिली जाऊ शकते शकते, जी फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT