शेअर बाजारात गुंतवणूक करुन बंपर कमाईची संधी तुमच्यासाठी आहे. या आठवड्यात तीन मोठे IPO ओपन होणार आहेत. सध्या अनेक कंपन्यांचे आयपीओ बाजारात आले आहे.
जर तुम्ही अजूनही कोणत्या IPO मध्ये गुंतवणूक केली नसेल तर तुमच्यासाठी एक संधी चालून आली आहे. येत्या आठवड्यात शेअर बाजारात कोणत्या कंपन्यांचे IPO लॉन्च होणार आहेत ते जाणून घेऊया.
1. JSW इन्फ्रा IPO
तब्बल १३ वर्षांनंतर JSW ग्रुप कंपनीचा (Company) आयपीओ येत आहे. पोर्ट हँडलिंग कंपनी JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा २८०० कोटींचा आयपीओ आज उघडत आहे. यासाठी कंपनीने ११३ रुपये ते ११९ रुपये प्रति शेअर किंमत (Price) ठरवली आहे. यावर २७ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे.
2. Updater Service IPO
चेन्नईचा (Chennai) अपडेटर सर्व्हिसेसचा IPO आज २५ सप्टेंबरला उघडत आहे. कंपनी या आयपीओच्या अंतर्गत ४०० कोटी रुपयांचे शेअर बाजारात लॉन्च करणार आहे. यासाठी कंपनीने २८०-३०० रुपयांची किंमत ठरवली आहे. यामध्ये प्रमोटर टांगी फॅसिलिटी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड 40 लाख शेअर्स विकणार आहे. तसेच या IPO साठी ५० शेअर्सचा लॉट निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूक करण्यासाठी १५००० रुपये लागतील. तसेच यामध्ये गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बोली लावू शकतात.
3. Valiant Laboratories IPO
Valiant Laboratories IPO हे पॅरासिटामोल निर्मात्याचे मेनबोर्ड असून याचा IPO हा २७ सप्टेंबरला उघडणार आहे. तर हा IPO ३ ऑक्टोबरला बंद होईल. Valiant Laboratories IPO हा रु.१५२.४६ कोटींचा बुक बिल्ट असून हा इश्यू 1.09 कोटी शेअर्सचा इश्यू आहे. Valeant Laboratories IPO ची सध्या किमत ₹133 ते ₹140 प्रति इक्विटी शेअर सेट करण्यात आला आहे.
DISCLAIMER : शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे, म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.