Mahindra XUV.e9 Saam Tv
बिझनेस

Upcoming Electric SUV: फ्यूचरिस्टिक लूक, जबरदस्त रेंज; येत आहे महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक कार XUV.e9

Mahindra XUV.e9: देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्र अँड महिंद्रा 2024 मध्ये नवीन इलेक्ट्रिक SUV लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Satish Kengar

Upcoming Mahindra XUV.e9: 

देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्र अँड महिंद्रा 2024 मध्ये नवीन इलेक्ट्रिक SUV लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी लवकरच आपली Mahindra XUV.e8 लॉन्च करू शकते. NGLO प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या या नवीन इलेक्ट्रिक कार्स कंपनी दोन सब-ब्रँड अंतर्गत लॉन्च करू शकते. यात XUV.E आणि BE चा समावेश आहे.

कंपनीची ही नवीन कार यावर्षीच्या अखेर बाजारात दाखल होऊ शकते. XUV.e8 हे XUV700 SUV इलेक्ट्रिक मॉडेल आहे. यातच आज आपण कंपनीची अपकमिंग इलेक्ट्रिक कार SUV Mahindra XUV.e9 बद्दल जाणून घेणार आहोत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डिझाइन

याच्या डिझाइन आणि इंटीरियरबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. महिंद्रा XUV.e9 ने आता डिझाइन पेटंटची नोंदणी केली आहे. ही कार 2025 च्या सुरुवातीस लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या कारला अंतिम रूप देण्याची तयारी सुरू आहे. या मॉडेलच्या पुढील बाजूस पूर्ण रुंद एलईडी बँड आणि बंपर-माउंटेड हेडलॅम्पसह सुसज्ज बंद मेटल ग्रील असेल. (Latest Marathi News)

याच्या कॉन्सेप्ट कारमध्ये हॅलोजन हेडलाइट्स होती. मात्र बाजारात येणाऱ्या मॉडेलला एलईडी युनिट्स मिळू शकतात. डिझाइनमध्ये रेक्ड रूफलाइन असेल. जे मागील बाजूस एका मोठ्या स्पॉयलरशी जोडले जाईल. याशिवाय फ्लश डोअर हँडल, एलईडी लाइट बारसह टेललाइट्स आणि ग्लॉस-ब्लॅक क्लेडिंग सारखे एलिमेंट्स देखील यामध्ये दिसतील.

फीचर्स

स्पाय शॉट्सवरून मिळालेली माहितीनुसार, यात कन्सोल गियर शिफ्ट लीव्हर आणि ट्रॅपेझॉइडल सेंट्रल एअर-कॉन व्हेंट दिले जाऊ शकते. आगामी Mahindra EV ला लेव्हल 2 अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम, हेड-अप डिस्प्ले (HUD) आणि V2L सारखी प्रिमियम फीचर्स दिले जाऊ शकते.

XUV.e9 च्या पॉवरट्रेनबद्दल अद्याप कोणतीही माहिती समीर आली नाही. मात्र यात ड्युअल मोटर सेटअपसह 80kWh बॅटरी पॅक मिळू शकतो. जो 230bhp ते 350bhp पॉवर आउटपुट देण्यास सक्षम असेल. या SUV ला ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टीम मिळेल, जी सुमारे 435 किमी ते 450 किमीची रेंज देऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT