Skoda Enyaq iV Saam Tv
बिझनेस

Upcoming Cars: जबरदस्त स्टाईल आणि पॉवरफुल इंजिन; यावर्षी भारतात लॉन्च होणार या कार्स, पाहा लिस्ट

Upcoming Cars in 2024: नवीन वर्ष 2024 अनेक बड्या कार उत्पादक कंपन्या आपल्या कार्स भारतात लॉन्च करणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Upcoming Cars in 2024:

नवीन वर्ष 2024 अनेक बड्या कार उत्पादक कंपन्या आपल्या कार्स भारतात लॉन्च करणार आहेत. यात टॉप-ऑफ-द-लाइन लक्झरी एसयूव्ही आणि एमपीव्ही, अपडेटेड फ्लॅगशिप आणि बिल्ट-फ्रॉम-स्क्रॅच ईव्हीसह अनेक नवीन कार समाविष्ट असतील. या अपकमिंग कार्सबद्दक जाणून घेऊया.

महिंद्रा थार 5-डोअर

स्टँडर्ड 3 डोअर थारच्या विक्रमी यशानंतर अधिक लांब व्हीलबेस असलेले 5-डोअर प्रकार लवकरच बाजारात येणार आहे. थार 5-डोअर 4x4 आणि 4x2 या दोन्ही प्रकारांमध्ये विकले जाईल. ई कार ऑगस्ट 2024 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. याची अंदाजे एक्स-शोरूम किंमत 16 लाख रुपये असू शकते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मारुती सुझुकी EVX

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी आपली पहिली ईव्ही लॉन्च करणार आहे. ही कार 2025 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. याची रेंज सुमारे 500 किमी असण्याची शक्यता आहे. याची अंदाजे एक्स-शोरूम किंमत 20-25 लाख रुपये असू शकते. (Latest Marathi News)

मर्सिडीज-बेंझ EQG

G-Wagon ची लोकप्रियता आणि यशानंतर आता कंपनी भारतात याचे इलेक्ट्रिक मॉडेल EQG आणणार आहे. जून 2025 मध्ये ही कार बाजारात येण्याची शक्यता आहे. याची अंदाजे एक्स-शोरूम किंमत 3.05 कोटी रुपये असू शकते.

लेक्सस एलएम

Toyota Vellfire प्रमाणेच लक्झरी फीचर्सने सुसज्ज Lexus LM देखील बाजारात येणार आहे. 3.5-लीटर टर्बो-पेट्रोल हायब्रिड पॉवरट्रेनसह येत असलेली ही MPV मार्च 2024 मध्ये येण्याची शक्यता आहे. याची अंदाजे किंमत 1.5 कोटी रुपये असू शकते.

Skoda Enyaq iV

स्कोडा ईव्ही सेगमेंटमध्ये आपलं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यासाठी कंपनी भारतीय ईव्ही बाजारात Enyaq iV लॉन्च करणार आहे. ही कार मार्च 2024 मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. याची अंदाजे किंमत 60 लाख रुपये असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT