Upcoming Compact SUVs: Saam Tv
बिझनेस

Upcoming Cars: 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत लवकरच लॉन्च होणार या 3 एसयूव्ही, पाहा लिस्ट

Upcoming Compact SUVs: या वर्षी लवकरच भारतात अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च होणार आहेत, ज्यांची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

Upcoming Compact SUVs:

भारतातील कॉम्पॅक्ट एसयूव्हीची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. त्यामुळे कॉम्पॅक्ट सेडानपासून हॅचबॅकपर्यंतच्या कारच्या विक्रीवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. कार कंपन्या आता कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटवर लक्ष केंद्रित करत आहेत. आता लवकरच भारतात अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च होणार आहेत आणि त्यांची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.

या वर्षी लवकरच भारतात अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च होणार आहेत, ज्यांची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. म्हणजेच, जर तुम्ही नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahindra XUV 3XO

महिंद्रा 29 एप्रिल रोजी भारतात आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV XUV 3XO लॉन्च करणार आहे. यात 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळू शकते. नवीन मॉडेलच्या डिझाईनमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. याशिवाय नवे इंटेरिअरही यात पाहायला मिळणार आहे. भारतात महिंद्राची नवीन XUV 3XO कार ही Hyundai Venue, Maruti Brezza, Tata Nexon आणि Kia Sonet शी स्पर्धा करेल.  (Latest Marathi News)

Skoda Compact SUV

स्कोडा लवकरच भारतात आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च करू शकते. यात 1.0L 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअर बॉक्सने सुसज्ज असेल. सध्या त्याचे नाव समोर आलेले नाही.

Hyundai Venue

Hyundai Motor India आपल्या कॉम्पॅक्ट SUV Venue चे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. एका रिपोर्ट्सनुसार, या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला ही कार लॉन्च केली जाऊ शकते. या नवीन मॉडेलचे कोड नाव Q2Xi आहे. नवीन मॉडेलच्या डिझाईनपासून त्याच्या इंटीरियरपर्यंत बरेच बदल पाहायला मिळू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

Viral Video Of Chain Snatching: चोरीचा हास्यास्पद प्रयत्न, पण शेवट झाला गजब, व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Chanakya Niti: 'या' ६ लोकांना कधीही आर्थिक मदत देणे टाळा, ते तुमच्या पैशाचा नाश करतात

Railway Ticket Offer : रेल्वेची भन्नाट योजना, तिकिटावर २० टक्के सूट, अट फक्त एकच

SCROLL FOR NEXT